धुळे : पिस्तुल विक्री करणार्‍या तरूणाला अटक
DT Crime Watch

धुळे : पिस्तुल विक्री करणार्‍या तरूणाला अटक

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे | प्रतिनिधी

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तरूणाला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या  पथकाने अटक केली. विकास रणजीत राजपुत असे अटक केलेल्याचे नाव असून त्याच्याकडून ५० हजार रूपये किंमतीचे दोन पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत.

याबाबत माहिती अशी की, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक  हेमंत पाटील यांना शहरात पिस्तूल विक्री करण्यासाठी तरूण आल्याची गुप्त  माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे अमळनेर नाक्यावर पथक दबा धरून बसले.  त्यानुसार विकास राजपुत हा तरूणाला त्याच्या जवळ ४० हजार रूपये किंमतीचे  एक पिस्तूल व १० हजार रूपये किंमतीचा एक गावठी कट्टा पोलिस पथकाने जप्त केला.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com