कन्हेरे येथे कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या
DT Crime Watch

कन्हेरे येथे कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

Balvant Gaikwad

अमळनेर । प्रतिनिधी

तालुक्यातील कन्हेरे येथील  जितेंद्र साहेबराव पाटील या तरूण शेतकर्‍याने दि.8 रोजी सकाळी 11 च्या सुमारास राहत्याघरी छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

त्यांच्या वडिलांच्या नावे 3 एकर शेती असून सोसायटीचे कर्ज आणि ओल्या दूष्काळाने उत्पन्न हातचे गेल्याने त्याने आत्महत्या केल्याचे गावकर्‍यांनी सांगितले. लहान मुलांनी जितेंद्रला घरात फासावर लटकलेले पाहून आरडाओरड केल्यावर  ग्रामस्थ जमा झाले.

शरद नारायण पाटील यांनी पो. स्टे.ला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हे.काँ.सुभाष महाजन करीत आहेत. जितेंद्र यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com