आम्ही मार्गदर्शक होतो, तुम्ही सक्षम व्हा : पारधी तरुणांना अधिक्षकांची हाक

0

 पारधी, पोलीस पाल्यांसाठी जॉब फेअरचे आयोजन

अहमदनगर (प्रतिनिधी)- पारधी सामाज्याकडे बघण्याचा दृष्टीकोण गुन्हेगारीचा असला तरी तो समाज वाईट नाही. त्याच्यातील काही व्यक्तीमध्ये गुन्हेगारी वृत्ती आहे. मात्र, या समाजात खूप चांगले तरूण आहेत. योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे ते दिशाहीन आहेत. त्यांना सक्षम करण्यासाठी आमची धडपड सुरू आहे. त्यासाठी पारधी समाज्याच्या तरूणांसाठी जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. या फेअरमध्ये पोलीस पाल्यांना देखील संधी देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली.

एसपी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. नाशिक परिक्षेत्रातील पारधी समाजास सक्षम करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी पुढाकार घेतला आहे. 26 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजता नगर शहरातील न्यू आर्ट महाविद्यालयात जॉब फेअरचे (नोकरीची संधी) आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी श्रीगोंदा व शेवगाव तालुक्यात मेळावे घेण्यात आला होता. त्यात 750 तरूणांनी नोकरीसाठी अर्ज नोंदणी केली आहे. पुणे जिल्ह्यातून 250 पेक्षा जास्त अर्ज दाखल झाले आहेत. ही संधी केवल नगर जिल्ह्यासाठी मर्यादीत नाही. तर नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार येथील पारधी व पोलीस पाल्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे.

शर्मा यांच्या उपक्रमाला परिक्षेत्रातून चांगला प्रतिसाद मिळत असून 900 पारधी समाज्याच्या तरुणांचे अर्ज तर एक हजार 780 पोलीस पाल्यांचे अर्ज नोकरीसाठी नोंदविण्यात आले आहे. पोलीस नोकरीत कायम व्यस्त असतो. त्याला आपल्या पाल्याकडे पाहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. तसेच बदल्या व अन्य कारणास्तव मुलांचे योग्य शिक्षण होत नाही. त्यामुळे शासनाने अशा प्रकारचे उपक्रम सुरू केले आहेत. या पलिकडे आम्ही पारधी समाजास मुळ प्रवाहात आणण्यासाठी शिक्षित तरुणांचा सामावेश केला आहे. त्यांच्यासाठी 450 तरुणांना 1 डिसेंबर रोजी पोलीस भरती प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे.

ही नोकर भरती प्रक्रिया राबविण्यासाठी भारतीय क्रिकेटपट्टू अजिंक्य राहणे यांचे नातलग किरण रहाणे यांनी यांनी प्रशासनाला मोठी मदत केली आहे. या तरूणांना नोकरी मिळण्यासाठी बाहेर देशातील 40 कंपन्या तर देशातील 10 कंपन्यांचा सामावेश आहे. यात अपंग असणार्‍या तरूणांना देखील नोकरीची संधी मिळणार आहे. त्यामुळे पारधी समाज्याच्या व पोलीस पाल्यांच्या तरुणांनी यात जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन शर्मा यांनी केले आहे.

जॉबकार्डवर 24 तासांत संदेश
48 तासांत नोकरी
यावेळी चांगल्या कंपन्या असल्यामुळे चांगला पगार मिळणार आहे. तसेच पारधी लोकांवरील गुन्हेगारीचा ठपका पुसणार आहे. त्यांच्यात सुशिक्षीत तरुण आहेत. मात्र मार्गदर्शन नसल्याने ते प्रवाहात नाही. आता ज्यांच्या नोंदी झाल्या. त्यांना जॉबकार्ड मिळणार आहे. आधारकार्ड प्रमाणे त्यास लिंक असणार आहे. ही लिंक नेटवर जाऊन ओपन करणे व त्यावर बायोडाटा पाठविणे. त्यानंतर 24 तासात नोकरीचा संदेश येणार. त्यास 48 तासाच्या आत उत्तर द्यायचे आहे. त्यानंतर थेट मुलाखतीस पात्र धरण्यात येणार आहे. तर योग्य वाटल्यास लगेच नोकरी मिळणार आहे.

पारधी तरुणांसाठी
संस्थाचालकांशी बोलणार
जिल्ह्यात अनेक संस्था आहेत. त्यावर कर्मचार्‍यांची संख्या कमी आहे. त्यामुळे अशा संस्थाचालकांशी प्रशासन बोलणी करणार आहे. जर गुन्हेगारीकडे वळण्यापेक्षा तरुर सक्षम होत असेल. स्वत:च्या पायावर उभा राहात असेल तर संस्थांनी सामाजिक सहकार्य समोर ठेऊन अशा तरूणांना पात्रतेनूसार नोकरीवर घेणे अपेक्षीत आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांशी आम्ही बोलणी करणार असल्याचे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*