अमली पदार्थ तस्करी प्रकरण : फरार अभिनेत्री ममता कुलकर्णीची २० कोटींची मालमत्ता जप्त होणार

0
ठाणे | ठाणे गुन्हे शाखेने कारवाई करत पकडलेल्या २२०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील संशयित ममता कुलकर्णीच्या मालकीच्या तीन सदनिका जप्तीचे आदेश न्यायलयाने दिले आहेत. न्यायालयाने दिलेल्या तारखेत हजर न राहिल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

२०१६ साली ठाणे गुन्हे शाखेने २२०० कोटी रुपयांचे इफेड्रिनची तस्करी पकडली होती. याप्रकरणात विकी गोस्वामी आणि पत्नी ममता कुलकर्णी यांच्यासह इतर काही जन संशयित आहेत. विकी गोस्वामी आणि ममता कुलकर्णी हे सध्या कॅनडात वास्तव्यास आहेत. न्यायालयात वारंवार हजर राहण्याचे आदेश दिले असतानादेखील ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामी न्यायालयात हजार राहिले नाहीत. त्यानंतर त्यांना फरार घोषित करण्यात आले.

त्यानंतर विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी ममताची मालमत्ता जप्त करण्याची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने मालमत्ता जप्तीचे आदेश दिले असून अंधेरीतील 20 कोटी रुपयांचे तीन फ्लँट जप्त करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*