नांदगाव तालुक्यात पाणी योजना ठप्प; पाच गावांना टँकरने पाणीपुरवठा

0
नांदगांव |तालुक्यात ५० % पर्जन्यवृष्टी झाली असून अजुन येथील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यातील वडाळी बु, वडाळी खु, दहेगांव, सोयगांव, मोरझर या गावांमध्ये पाण्याअभावी पिके धोक्यात आली आहेत.

पर्जन्यमान कमी असल्याने भर पावसाळ्यात या गावांमध्ये पिण्यासाठी पाण्याचे  टँकर सुरु करण्यात आले आहेत.

तालुक्यातील ही गावे गत पाच वर्षापासून दुष्काळाच्या छायेत आहेत. या वर्षीही गावे पाण्यासाठी तहाणलेली आहेत. शिवाय या गावांना पाणी योजना देखील ठप्प झाल्या असून यावर्षी तर भर पावसाळ्यात येथे पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करण्यात आल्यामुळे दुष्काळाचे सावट तीव्र झाले आहे.

LEAVE A REPLY

*