Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedबोदवड शहरावर आता ड्रोनची नजर

बोदवड शहरावर आता ड्रोनची नजर

  कोरोना व्हायसरच्या वाढत्या प्रार्दूर्भावामूळे सरकारकडून हवी ती दक्षता घेतली जात आहे. प्रतिबंधात्मक ऊपायासाठी जनजागृती करुनही नागरिक मोकाट अवस्थेत बाहेर फिरतांना आढळून दिसत असल्याने पोलिस प्रशासन लाठ्यांचा वापर करुन फटके देत आहेत.
तरीही  काही नागरिक एकत नसल्याने पोलिसांनी गून्हे दाखल करुन कारवाई करुन गून्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
या पार्श्वभूमिवर बोदवड नगरपंचायत व तहिसल प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता ड्रोनची मदत घेतली आहे. त्यामूळे ; संचारबंदीचे ऊल्लंघन तसेच सोशल डिस्टन्स न पाळणार्यांवर आता ड्रोन वॉच राहणार आहे.
विनाकारण व मोकाटपणे फिरणार्यांचे छायाचित्र थेट ड्रोन कँमेरा टिपत असल्याने थेट कारवाई होणार आहे. दिनांक १ रोजी नगरंपचायतीचे मूख्याधिकारी श्री. भोसले व तहसिलदार रविंद्र जोगी व पोलिस प्रशासन यांच्या समन्वयाने हा ऊपक्रम बोदवड शहरात सूरु करण्यात आला.
त्याचे प्रात्यक्षिक दिनांक १ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात घेण्यात आले. याबाबत शहरातील संजय वराडे यांनी फेसबूकवर याप्रकाराचे फोटोज व्हायरल केले आहेत.
त्यात ड्रोनचा व्हिडिओ काढून त्याला ‘बचके रहना रे बाबा… बचके रहना रे ; तूझपे नजर है’ हे गाणे लावत व्हायरल केले आहे. त्यामूळे बाहेर बेकायदेशीर ; मोकाट फिरणार्यांनो घरातच बसा अन्यथा ; ड्रोनच्या संपर्कात आल्यास प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या