सातपूरला पाणी तुंबल्यावर छत्री घेऊन अधिकाऱ्यांची गाळ काढण्यासाठी तत्परता

0

सातपूर (प्रतिनिधी) ता. १४ : आजच्या पावसाने महापालिकेच्या गटार स्वच्छतेतील ढिसाळ कारभार पुन्हा एकदा उघडा पाडला.

परिणामी दस्तुरखुद्द सातपूर विभागीय कार्यालयासमोरच गुडघ्याइतके पाणी साचले. त्यामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याची एक बाजू बंद करावी लागली.

दरम्यान पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा न झाल्याने येथील अनेक रहिवाशांच्या घरात पाणी शिरले.

सिद्‌धार्थ चौक, स्वारबाबानगर, सातपूर गावातील घरांमध्ये पाणी शिरल्याने तेथील नागरिकांची पाणी काढण्यासाठी तारांबळ उडाली.

इतके सगळे झाल्यानंतर पुन्हा एकदा जागृत झालेल्या मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भर पावसात छत्री घेऊन जेसीबीच्या साह्याने गाळ काढण्याची मोहीम सुरू केली.

परंतु तो पर्यंत नागरिकांचे पाण्यामुळे व्हायचे ते नुकसान होऊन गेले होते.

स्वच्छता अभियानात देशात नाशिक शहराचा क्रमांक खाली गेल्यानंतर पहिल्याच पावसाने पाणी तुंबल्याने नाशिकच्या गटार योजना आणि स्वच्छता मोहीमेच्या कामातील ढिसाळपणा उघडा पडला होता.

मात्र त्यातूनही महापालिकेने बोध न घेतल्याने आज अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागला.

LEAVE A REPLY

*