Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

डॉ. विखेंचे दणदणीत यश

Share

पवारांची पावर ओसरली : मतदारसंघ पुन्हा भाजपासोबतच

अहमदनगर – अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दणदणीत यश साजरे केले आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांच्यापेक्षा तब्बल पावणेदोन लाखांच्या मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे. अंतिम 5 फेर्‍यांची आकडेवारी हाती येणे बाकी आहे. मात्र डॉ.विखेंना मतदारांनी दिलेला प्रतिसाद जबरदस्त ठरला आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघ राज्यात चर्चेत होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ.सुजय विखे यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केल्याने मोठा राजकीय भूकंप झाला होता. तत्पूर्वी नगर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून बरीच ओढाताण झाली होती. राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेली ही जागा काँग्रेसने मागीतली होती. मात्र राष्ट्रवादीने जागा सोडण्यास नकार दिला. डॉ.सुजय यांना भाजपाने उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादीने नगरचे आमदार संग्राम जगताप यांना मैदानात उतरविले.

मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीला कमाल करता आली नाही, हे निकालातून स्पष्ट झाले. हा मतदारसंघ राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी प्रतिष्ठेचा केला होता. काँग्रेसचे नेते आ.बाळासाहेब थोरात यांनीही आघाडीच्या विजयासाठी जोर लावला होता. गुरूवारी मतमोजणीत प्रारंभापासून डॉ.विखे यांनी आघाडी घेतली. एक फेरीत नगर शहरात आ.जगताप यांना 5 हजारांवर मतांचे मिळालेले मताधिक्य वगळता मतांवर पूर्णत: विखेंचेचे वर्चस्व दिसले.

प्रत्येक फेरीत आणि प्रत्येक विधानसभा क्षेत्रात त्यांनी मुसंडी मारली. हाती आलेल्या आकडेवारीनुसार प्रत्येक्ष विधानसभा क्षेत्रात त्यांंना लक्षणीय मतदान झाले आहे. विशेष म्हणजे जगतापांचा होमपिच असलेल्या नगर शहरातही त्यांनी 40 हजारांची निर्णायक आघाडी घेतली आहे. अंतिम आकडेवारीनंतर त्यांचे मताधिक्य अधिक असेल. दरम्यान, या निकालानंतर दक्षिण मतदारसंघाचे राजकारणावर मोठा परिणाम संभवतो. आगामी विधानसभा निवडणुकीवर याचे पडसाद उमटणार असून युतीला या निकालाचा लाभ मिळण्याची चिन्हे आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!