डॉ. तनपुरे कारखाना बंद पाडण्याचे पातक तनपुरेंचेच ; आ. कर्डिले

0
उंबरे ़(वार्ताहर) – डॉ. तनपुरे कारखान्यावर 300 कोटी रुपयांचे कर्ज करून कारखाना बंद पाडण्याचे पातक तनपुरेंनीच केले. तोच कारखाना शेतकरी व कामगारांच्या हितासाठी पुन्हा आम्हालाच चालू करावा लागला. ज्यांचा विकासकामे करण्याचा पिंडच नाही, त्यांना आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही, अशी खिल्ली आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी उडविली. कारखाना निवडणुकीत दिलेला शब्द मी पाळला, अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली.
राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथील नवले वस्ती वांबोरी येथील साळुंके वस्तीवर महाराष्ट्र शासन जलयुक्त शिवार अभियान सन 2016-17 अंतर्गत सिमेंट नाला बंधारे कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार कर्डिले यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.चे माजी सदस्य अ‍ॅड. सुभाष पाटील होते. ते म्हणाले, सन 2015-16 मध्ये जिल्ह्यात दुष्काळात 400 ते 500 टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. मात्र, जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आल्याने पाण्याची टंचाई दूर झाली असून 500 टँकरची संख्या आता 100 वर आली आहे. सन 2019 सालापर्यंत सर्व दुष्काळी गावांना जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामे केली जाणार आहेत. शेतकर्‍यांनी जागेसाठी या योजनेला मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड म्हणाले, राज्य सरकारने दोन वर्षापासून जलयुक्त शिवार अभियान यशस्वीपणे राबविले आहे. त्याचा फायदा लाभार्थी शेतकर्‍यांना झाला आहे. पाण्याचा थेंब न् थेंब यातून अडविण्यात आला आहे. ओढे, नाले व बंधार्‍यातील गाळ काढण्यासाठी आर्थिक मदतीचा हात शासनाने पुढे केला आहे. या योेजनेचा लाभ शेतकर्‍यांनी घ्यावा, असे आवाहन प्रा. बेरड यांनी केले.
यावेळी सोपानराव म्हसे, उत्तमराव म्हसे, उत्तमराव कोळसे, सुखदेव कुसमुडे, विक्रम तांबे, नानासाहेब गागरे, बाळकृष्ण बानकर, नामदेव ढोकणे, सुरसिंग पवार, सुरेश बानकर, सरपंच कावेरी पटारे, दत्तात्रय गांधले, एकनाथ ढवळे, शरद दांगट, बाबा तांबे, रायभान घुगरकर, कृष्णाजी होळकर, संजय तरवडे, नानासाहेब तरवडे, रंगनाथ गवते, उज्ज्वला नवले, सुमनताई सरोदे, मिनाक्षी साळुंके, प्रमोद गांधले, सीताराम ढोकणे, नंदू ढोकणे, इश्‍वर कुसमुडे, कृष्णा पटारे, उत्तमराव पटारे, दत्तात्रय मोरे, अर्जुन दुशिंग, एकनाथ दुशिंग, भाऊसाहेब तांबे, बाबासाहेब दारकुंडे, उपअभियंता पी.बी. गायसमुद्रे, आर.ए. गायकवाड,
अनिल मुळे, विजयकुमार थोरात, प्रभाकर हरिश्‍चंद्रे, शिवाजी साठे, संजय तमनर, अशोक पटारे, भानुदास राऊत, संदीप गिते, राजेंद्र गोपाळे, जगन्नाथ चौधरी, जनार्दन ढोकणे, गणेश पारे, सुकुमार पवार, मच्छिंद्र जगदाळे, राजेंद्र साळुंके, मार्तंड गडाख, संभाजी गडाख, संजय घावटे, अशोक रासकर, जब्बार पठाण, शामराव पटारे, रामभाऊ बोरकर, चंद्रकांत गडाख, लालू वाघ, सचिन साळुंके, राहुल साळुंके, निसार शेख, रमेश पिंपळे, भाऊसाहेब पटारे, अशोक रेबडे, लक्ष्मण बोरकर, चंद्रकांत नवले, राजू वांढेकर, सुदामराव नवले,
दत्तू नवले, संभा सरोदे, चिमाजी नवले, संदीप आढाव, मुरलीधर आढाव, बापूराव नवले, गंगाराम हणमंत, दामोदर सरोदे, साहेबराव सरोदे, भागचंद नवले, श्रीनाथ तांबे, सीताराम सरोदे, पोपट काळे, नामदेव बर्डे, शिवाजी नवले, पवन नवले, सुदाम सरोदे, अशोक आढाव, दीपक सरोदे, ताराबाई चेंडवाल, चंद्रहास नवले, पांडुरंग नवले, बाळासाहेब तांबे, ज्ञानदेव आढाव, ग्रामविकास अधिकारी संजय गिर्‍हे, अ‍ॅड. तात्यासाहेब डोळसे, आदींसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

आ. कर्डिले यांनी काय दिवे लावले? अशी टीका काही निष्क्रिय नेत्यांनी केली आहे. डॉ. तनपुरे कारखाना सुरू करण्यासाठी कर्डिलेंची जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून मोठी मदत झाली. त्यामुळे कारखाना चालू होणार आहे. यापेक्षा कोणते दिवे लावले पाहिजे? असा प्रतिसवाल अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी तनपुरे यांचे नाव न घेता केला. वांबोरी चारीचे बटन कधी दाबणार? असा प्रश्‍न अ‍ॅड. पाटील यांनी आ. कर्डिलेंना विचारला. त्यावर आ. कर्डिलेंनी चार दिवसात यावर निर्णय होणार असल्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

*