Thursday, May 2, 2024
Homeनगरडॉ. विखेंसह चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक देणार राजीनामे

डॉ. विखेंसह चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक देणार राजीनामे

उंबरे |वार्ताहर| Umbare

डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे सध्या जिल्ह्यामध्ये उपोषण गाजत आहे. या उपोषणाच्या धर्तीवर कारखान्याचे मार्गदर्शक व तज्ज्ञ संचालक डॉ. सुजय विखे, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ राजीनामा देणार असल्याची चर्चा सध्या तालुक्यामध्ये सुरू आहे.

- Advertisement -

कारखान्याच्या कामगारांनी गेल्या अनेक वर्षापासून थकीत पगार ग्रॅज्युईटी फंड यासाठी गेल्या पाच-सहा दिवसांपासून राहुरी फॅक्टरी येथे शिवाजी पुतळ्यासमोर उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला अनेक संघटनांनी, लोकप्रतिनिधी, पदाधिकार्‍यांनी पाठिंबा दर्शविला आहे. कारखान्याचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी कामगारांचे उपोषण सोडण्यासाठी कामगार यांच्याशी चर्चा केली आहे. परंतु कामगार आपल्या भुमिकेशी ठाम असून कुठल्याही प्रकारे आम्ही आमचे उपोषण थांबविणार नाही. आम्हाला सक्षम अधिकारर्‍यांपुढे कारखान्याने लेखी द्यावे, आमच्या मागण्या मान्य कराव्यात, तरच आम्ही उपोषण थांबवू, अशी भूमिका घेतल्यामुळे कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळ मेटाकुटीस आले आहे.

अशा परिस्थितीमध्ये काही संचालकांनी कारखान्याचे मार्गदर्शक, चेअरमन, व्हाईस चेअरमन, आपण आपल्या संचालक मंडळाचे राजीनामे देऊ, असा पवित्रा घेतला असल्याचे समजते. यातच खासदार डॉ. सुजय विखे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, यांच्या नेतृत्वाखाली राहुरी येथे आज रविवारी शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यामध्ये नेमके काय घडते? याकडे राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या