Type to search

Featured मुख्य बातम्या राजकीय सार्वमत

पदासाठी नाही तर लोकहितासाठी निवडणूक लढलो – डॉ. सुजय विखे

Share

मला खासदार म्हणण्यापेक्षा दादाचं म्हणा 

लोणी (वार्ताहर)- पद्मश्री डॉ. विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सामाजिक बांधिलकी पत्करून केलेल्या लोकहिताच्या कार्यामुळे विखे परिवाराची देशात प्रतिमा निर्माण झाली.आपणही हाच वारसा पुढे चालवताना पदासाठी नाही तर लोकहितासाठी निवडणूक लढवली म्हणून मला खासदार म्हणण्यापेक्षा दादाचं म्हणा असे भावनिक उद्गार अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी काढले.

निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर खा. डॉ. सुजय विखे पाटील रात्रौ 12 वाजता आपल्या लोणी बुद्रुक गावी पोहचले. लोणी ग्रामस्थ आणि प्रवरा परिवारातील हजारो चाहते त्यांच्या आगमनाची वाट बघत होते. दुपारपासूनच ग्रामस्थांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करीत या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष सुरु केला होता. डी जे, ढोलीबाजाच्या तालावर चाहते थिरकत होते.
सर्वप्रथम रात्रौ 11 वाजता या विजयाचे शिल्पकार व ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे गावात आगमन होताच त्याची भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. श्रीराम मंदिर प्रांगणात यावेळी विजयी सभा आणि सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील होते. सभा सुरु झाल्यानंतर खा.डॉ. सुजय विखे पाटील यांचे आगमन झाले आणि उपस्थितांनी एकच जल्लोष केला.

खा.डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, पवार- थोरातांनी कोंडी केली म्हणून मी योग्य पक्षात गेलो आणि मोठ्या मताधिक्याने निवडून आलो.दोघांनाही धन्यवाद दिले पाहिजेत. आम्हाला एकटे पाडण्याचा प्रयत्न झाला म्हणून निर्णय घ्यावा लागला आणि तो योग्य ठरला. नामदारांनाही मी आता भाजपमध्ये येण्याची विनंती करणार आहे. नाही तरी तिकडे काय राहिलंय. राष्ट्रीय अध्यक्ष पराभूत झालेत आणि प्रदेशाध्यक्षही पडले आहेत. तिकडे थांबून काय करता.खासदार साहेबांची पुण्याईमुळे मला भाजपमध्ये जाण्याची बुद्धी सुचली. जुन्या जखमांना मलम लागल्याचा मला खरा आनंद आहे. सर्वसामान्यांमध्ये राहून त्यांचे प्रश्न सोडवतो म्हणून कुणालाच घाबरत नाही. नगरच्या निवडणुकीवेळी मी सांगितले होते, ज्यांना ज्यांना यायचे त्यांनी या..कुणी मुक्कामाला थांबा कुणी सभा घ्या, कुणाला काय आरोप करायचे ते करा. आणि त्याचा काहीच परिणाम झाला नाही हे निकालावरून स्पष्ट झाले आहे. उलट मी संगमनेर मध्ये पाच-सहा सभा घेतल्या तरी खा.लोखंडेना 7 हजाराचे मताधिक्य तेथून मिळाले आहे.

मला पदाचा कधीच मोह नव्हता. मी पदासाठी निवडणूक लढलो नाही. खासदारांनी मला सर्वसामान्य लोकांत राहून त्यांचे प्रश्न सोडावावेत आणि त्यासाठी आमदार होऊ नको तर खासदार हो, असे सांगितले होते. दिल्लीतून जे राजकारण होते, ते राज्यातून होत नाही असे ते म्हणायचे. विखे कुटुंबावर प्रेम करणारे कार्यकर्ते आणि त्यांची ताकद आपण या निवडणुकीत अनुभवली. पद्मश्री विखे पाटील आणि खासदार साहेब यांच्या कार्यातून देशात विखे कुटुंबाची निर्माण झालेली प्रतिमा या निवडणुकीमुळे पुन्हा निर्माण झाली असून खासदार साहेबांना हा विजय हीच खरी श्रद्धांजली आहे.

.मी खासदार झालो असलो तरी मला खासदार म्हणण्यापेक्षा प्रेमाने दादा म्हटलेले आवडेल.पदं येतात आणि जातात. विजयासाठी परिश्रम घेतलेले कार्यकर्ते आणि ज्ञात-अज्ञात सर्वाचे त्यांनी यावेळी आभार व्यक्त केले.ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, डॉ.सुजयचा विजय ऐतिहासिक आहे. आपल्याच पक्षातील लोकांनी व्युव्हरचना केली होती. डॉ.सुजयने अन्यायाविरुद्ध भूमिका घेतली आणि अचूक निर्णय घेतला. मीही नैतिकतेच्या दृष्टीने पदाचा राजीनामा लगेच पक्षाकडे दिला. विखे कुटुंबावर कार्यकर्त्यांनी नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. लोणी ग्रामस्थ नेहमी खासदार साहेबांच्या भूमिकेसोबत राहिले.आजही ग्रामस्थांचा खंबीर पाठींबा राहिल्याने आपण सर्वजण या ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार बनलो आहोत.

यावेळी अण्णासाहेब म्हस्के यांनी डॉ. सुजय यांचा विजय नगर जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल अशी घटना असल्याचे सांगत खासदार साहेबाना आज खर्‍या अर्थाने श्रद्धांजली असल्याचे सांगितले. यावेळी बापूसाहेब आहेर, शांतीनाथ आहेर, भाऊसाहेब कातोरे, मुकुंदराव सदाफळ यांची भाषणे झाली.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, सभापती हिराबाई कातोरे, काशिनाथ विखे, विक्रम विखे, किसनराव विखे, सुभाष विखे, संपतराव विखे, लक्ष्मण बनसोडे, चांगदेव विखे, किशोर धावणे, गणेश विखे, राहुल धावणे, भाऊसाहेब विखे, सचिन विखे, लक्ष्मण विखे, गणेश मैड यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, सेवक, लोणीचे ग्रामस्थ व परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रारंभी उपसरपंच अनिल विखे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर अशोक धावणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

आ. थोरात, आ. कांबळेंवर टीका – 
काहींना आभाळ ठेंगणं झालं होतं. त्यांना (थोरात) मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडायला लागली होती. ती मंगेरीलालची स्वप्न होती. नगर जिल्ह्यात इतिहास घडला. डॉ. सुजय आणि खा. लोखंडेंना जनतेने निवडून दिलं. खा.लोखंडेंच्या 1 लाख 29 हजार मताधिक्यामध्ये शिर्डी मतदार संघातून 62 हजार एवढे सर्वाधिक योगदान आहे. मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणार्‍याच्या मतदार संघात खा. लोखंडे यांना 7 हजार 900 मताधिक्य आहे. आ. कांबळे यांना सांगूनही त्यांनी माझं ऐकली नाही. श्रीरामपूर मधून खा. लोखंडे यांना 24 हजारांचे मताधिक्य मिळाले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!