गणेश कारखाना चांगला चालावा ही सर्वांची जबाबदारी : डॉ. सुजय विखे

0

 कार्यक्षेत्रातील ऊस ‘गणेश’लाच द्या, लागवडी वाढवा

अस्तगाव (वार्ताहर) – गणेश कारखाना चांगला चालावा ही सर्वांचीच जबाबदारी आहे, ना. विखे पाटलांनी गणेश चालवायला घेतला तो व्यवसाय म्हणून नाही तर सभासद शेतकरी कामगार टिकला पाहिजे या माणुसकीच्या भावनेतून घेतला. ऊस गणेशलाच द्या, संचालक, कार्यकर्ते यांनी शेतकर्‍यांनी ऊस लागवडी कराव्यात यासाठी आग्रह धरावा, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
गणेश सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ डॉ. सुजय विखे पाटील व धनश्रीताई सुजय विखे पाटील या उभयतांच्या हस्ते विधिवत पूजनाने झाला. त्याप्रसंगी आयोजित समारंभात डॉ. विखे पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर गोंदकर होते.
गणेशचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव लाटे, गणेशचे उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, गणेशचे कार्यकारी संचालक अभिजित भागडे, पंचायत समितीच्या सभापती हिराबाई कातोरे, बाजार समितीचे उपसभापती वाल्मिकराव गोर्डे, राहात्याचे माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, नीलेश कोते, योगेश चौधरी, जिपच्या सदस्या कविता लहारे, पंचायत समितीच्या सदस्या अर्चना आहेर, माजी सभापती बेबीताई आगलावे, निवास त्रिभुवन, राजेंद्र लहारे, बापूसाहेब लहारे, सुभाषराव गमे, शिवाजी वाघ, रावसाहेब देशमुख, नंदकुमार गव्हाणे, कैलास जेजूरकर, बाबासाहेब डांगे यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य, सभासद, शेतकरी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशच्या सभासदांनी ना. विखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्‍वास व्यक्त केला. ना. विखे पाटलांनी कामगार, सभासद, शेतकरी यांचे हित जपण्यासाठी कारखाना चालवायला घेतला असल्याचे सांगून डॉ. विखे पाटील म्हणाले, गणेशमध्ये यंत्रात बदल, बॉयलर, सेंट्रीफ्युगल, अशा नव्याप्रणाली लावल्या, मोठा खर्च विखे पाटील कारखान्याने केला. पुढील वर्षी एक कोटी खर्च केल्यानंतर त्यानंतर खर्च करण्याची फारशी गरज राहाणार नाही.
त्यानंतर कारखान्याला नफा होत जाईल असा विश्‍वास व्यक्त करून डॉ. विखे पाटील म्हणाले, गणेश कारखान्याला स्वत: च्या कार्यक्षेत्रात किमान 80 टक्के स्वत:चा ऊस उभा राहिला हवा, पाण्याची स्थिती चांगली आहे, ना. विखे पाटील यांच्या आग्रहाने पाच रोटेशन मिळणार आहेत. संचालक व कार्यकर्त्यांनी ऊस लागवडीसाठी जोमाने प्रयत्न करावेत.
ऊस लावगडीसाठी वेगवेगळ्या पध्दती वापरा, पुढील आठवड्यापासून गणेशच्या कार्यक्षेत्रात ऊस लागवडी वाढाव्यात म्हणून शेतकरी बैठकांचे नियोजन करण्यात येणार आहे. यावर्षी 2.5 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करू, शक्य झाल्यास तीन लाख मेट्रिक टन गाळप करू, 11.5 टक्के उसाचा उतारा घेण्याचा प्रयत्न करू, विखे पाटील कारखाना आणि गणेश कारखान्याचे गाळप एकाच वेळी 6 नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष सुरू होईल.
गणेशचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ म्हणाले, ना. विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटील यांनी गणेशमध्ये 12 कोटी रुपये खर्च करून बॉयलर, सेंट्रीफ्युगल यंत्र बसविले. कारखान्याला स्वत:च्या कार्यक्षेत्रातला ऊस असावा, म्हणून शेतकरी बांधवांनी ऊस लागवड करावी, कोल्हापूर सारखे जास्त उत्पादन आपल्या शेतात घेण्यासाठी विविध प्रयोग राबवा. सूत्रसंचालन प्रा. दिनेश भाने यांनी केले तर आभार संचालक विशाल चव्हाण यांनी मानले.
याप्रसंगी विखे कारखान्याचे कार्यकारी संचालक ए. आर. ताबे, आर. डी. शितोळे, गणेशचे संचालक भाउसाहेब शेळके, अ‍ॅड. शिवराम गाडेकर, मधुकरराव कोते, अशोकराव दंडवते, सुदामराव सरोदे, सौ. नलिनी डांगे, विजय गोर्डे, जे. आर. चोळके, जालिंदर निर्मळ, अण्णासाहेब सदाफळ, गोरक्षनाथ बनसोडे, बाळासाहेब दाभाडे, पुरुषोत्तम गोरे, सौ. भारतीताई गोरे,
राजेंद्र थोरात, राम कोते यांच्यासह बापूसाहेब लहारे, संदीप लहारे, राजेंद्र पठारे, सुनील चोळके, विखे कारखान्याचे संचालक कैलास तांबे, प्रताप तांबे, रामचंद्र जवरे, विजय खर्डे, राजेंद्र खर्डे, भाउसाहेब चेचरे, भागवतराव उंबरकर, मच्छिंद्र पावडे, सारंगधर दुशिंग, जे. पी. जोर्वेकर, पोपटराव उंबरकर, भारत लोखंडे, पी. डी. गमे, बाळासाहेब सुधाकर गमे, डॉ. धनंजय धनवटे यांच्यासह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्या संस्थांचा विकास खुंटला –

ज्या संस्थांमध्ये ना. विखे पाटील यांचे नेतृत्व नाही, त्या संस्थांचा विकास खुंटला आहे, असे सांगताना डॉ. विखे पाटील म्हणाले, राहाता पालिकेचे वर्षभरापासून एक रुपयाचेही विकास काम नाही. शिर्डी संस्थानमध्ये विकास खुंटला आहे. मोदींनी जरी अच्छे दिनचे आश्‍वासन दिले असले तरी ते प्रत्यक्षात नाही; परंतु शिर्डी मतदार संघात मात्र विरोधी पक्ष नेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विविध विकास कामांच्या माध्यमातून अच्छे दिन आणले आहेत. असे डॉ. विखे पाटील म्हणताच, त्यांच्या बोलण्याला उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

दूध संकलन आणि उसाची विल्हेवाट –

  गणेश कारखान्याला ऊस घाला, अन्य कारखान्यांना ऊस देऊ नका, असे आवाहन करताना डॉ. विखे पाटील म्हणाले, काहीजण आपला ऊस इतर कारखान्यांना देतात. दूध संकलनासारखे करू नका, कधी इकडे कधी तिकडे! सर्व थरावर पाय ठेवण्याचे काम करू नका, ऊस गणेश कारखान्यालाच द्या, आम्ही शारिरिक मानसिक त्रास सोसून तुमच्यासाठी काम करतो, गणेश तुमचा आहे, त्याला पुढे आणण्यासाठी ऊस लागवडीवर भर द्या, ऊस हेच सुरक्षित पीक आहे. असेही डॉ. विखे पाटील म्हणाले.

LEAVE A REPLY

*