Type to search

ब्लॉग

Blog : शिक्षक दिन विशेष : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरील विशेष ब्लॉग…

Share

स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती म्हणून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची ओळख भारताला आणि जगाला आहे. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे  थोर तत्वज्ञानी, शिक्षक, प्राध्यापक होते व शिक्षणक्षेत्रासाठी अत्यंत प्रेम, व आदर होता, त्यामुळेच त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती म्हणून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची ओळख भारताला आणि जगाला आहे. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे  थोर तत्वज्ञानी ,शिक्षक ,प्राध्यापक होते व शिक्षणक्षेत्रासाठी अत्यंत प्रेम,व आदर होता, त्यामुळेच त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.

बालपण : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी मद्रास जवळील तिरुमनी या खेडे गावी झाला. ते ब्राम्हण कुळातील असल्याने त्यांच्या घरात नेहमी विधी केल्या जायच्या.त्या धार्मिक वातावरणातच ते लहानाचे मोठे झाले , त्यांच्या वडिलांचे नाव विरारस्वामी होते , ते गरीब होते परंतु अतिशय विद्वान ब्राम्हण होते .

शिक्षण : डॉ. राधाकृष्णन यांचे प्राथमिक शिक्षण ते राहत असलेल्या गावात म्हणजेच तिरुमनी येथे झाले. पुढचे शिक्षण घेण्यासाठी त्यांना वडिलांनी खिश्चन मिशनर्यांनी चालवलेल्या लुर्थ मिशन स्कुल तिरुपती मध्ये टाकले . सन १९०० मध्ये राधाकृष्णन वेल्लूर मधील एका कॉलेज मधून महाविद्यालयीन शिक्षण घेऊ लागले. त्यानंतर मद्रासमधील एका ख्रिश्चन कॉलेज मधून १९०६ मध्ये तत्वज्ञानामध्ये M. A . पूर्ण केले . राधाकृष्णन याना सर्व शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळायची, यातूनच त्यांनी शिक्षण पूर्ण केले. तत्वज्ञान हा त्यांचा अत्यंत आवडीचा विषय होता.

 कारकीर्द सुरुवात : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कारकिर्दीची सुरुवात शिक्षण क्षेत्रापासूनच सुरु झाली. तत्वज्ञान हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय होता. १९०९ मध्ये राधाकृष्णन मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज मध्ये व्याख्याता म्हणून कार्यरत झाले. त्यानंतर १९१६ मध्ये ते त्याच कॉलेजात तत्वज्ञानाचे सहाय्यक प्राध्यापक बनले. १९१८ मध्ये म्हैसूर विद्यापीठाने त्यांना प्राध्यापक म्हणून निवडले परंतु त्यापूर्वीच इंग्लंडच्या ऑक्सफर्ड  विद्यापीठामध्ये ते भारतीय तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

प्रत्येक ठिकाणी त्यांच्या ज्ञानाला लोक सलाम करीत होते. शिक्षणाला त्यांनी आपल्या जीवनामध्ये खूप प्राधान्य दिले आणि त्यामुळेच ते विद्वान झाले, तत्वज्ञानी झाले. शिक्षणाच्याप्रती असलेल्या आवडीमुळेच त्यांना शैक्षणिक व्यक्तिमत्व आणि ओळख मिळत होती. जीवनामध्ये नेहमी नवीन नवीन गोष्टी शिकण्यामध्ये त्यांना रस होता. ज्या महाविद्यालयातून त्यांनी M. A. पूर्ण केले होते.

त्याच महाविद्यालयाचे त्यांना उप- प्राचार्य बनवले परंतु एका वर्षानंतर त्यांनी त्या पदाचा राजीनामा देऊन ते बनारस विद्यापीठात उपकुलपती म्हणून कार्यरत झाले . या सर्व वेळामध्ये तत्वज्ञानावर आधारित अनेक पुस्तके सुद्धा ते लिहत होते. डॉ. राधाकृष्णन विवेकानंद आणि वीर सावरकर याना आपले आदर्श मानत असत. आणि त्यांच्या जीवनावरील त्यांचा गाढा अभ्यास होता. राधाकृष्णन यांनी आपल्या लेखनातून आणि भाषणातून संपूर्ण जगाला भारतीय तत्वज्ञानाची ओळख करून दिली .

राजकारणातील प्रवेश : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी राधाकृष्णन यांना विनंती केली की, विशेष राजदूत म्हणून आपण सोव्हियत संघासोबत सामाजिक कार्यात सलोखा निर्माण करावा, नेहरू यांची विनंती ऐकून डॉ. राधाकृष्णन संविधान निर्मिती सदस्य म्हणून काम करू लागले. शैक्षणिक यशानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये त्यांनी प्रवेश केला. १९६२ मध्ये डॉ . राधाकृष्णन यांनी राष्ट्र्पती पदाची शपथ घेतली , तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिवस म्हणून साजरा केला जावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतःच उच्च शिक्षित ,शिक्षणाला प्राधान्य व महत्व  देणारे, थोर तत्वज्ञानी होते तसेच ते स्वतः शिक्षक , प्राध्यापक , कुलपती , होते तसेच शिक्षकांप्रती त्यांचे खूप प्रेम व आदर होता. या सर्व गोष्टी पाहता भारत सरकारने त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक गौरव दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. व तेव्हापासून ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा होऊ लागला . डॉ .राधाकुष्णन म्हणायचे की शिक्षकांचा गौरव हाच माझा गौरव असेल.

गुरूंबद्दल ऋणानुबंधन : व्यक्तीचा जन्म झाल्यापासून ते आयुष्यभर, व्यक्ती प्रत्येक क्षणाला इतरांकडून काही ना काही शिकत असतो, ते सर्व आपले गुरूच असतात मग त्यामध्ये आपले आई वडील ,शिक्षक , नातेवाइक, मित्र , मैत्रीणी , व इतर ओळखी तसेच अनोळखी व्यक्तीसुद्धा येतात. आई वडील हे आपले पहिले गुरु असतात,आई आपल्याला चालायला शिकवते, बोलायला शिकवते , चांगले संस्कार व जडणघडण करण्याचे महत्वाचे काम करत असते.

त्यानंतर शाळेतील गुरु म्हणजेच आपले शिक्षक हे आपल्या जीवनात महत्वाचे असतात. शिक्षकाला जीवनाचा शिल्पकार असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही . ज्याप्रमाणे एखादा कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर प्रतिकृती निर्माण करत असतो तसेच शिल्पकारसुद्धा  ओबडधोबड दगडाला आकार देऊन एक सुंदर शिल्प तयार करत असतो , त्याचप्रमाणे शिक्षकसुद्धा एकप्रकारे जीवनाचा शिल्पकार असतो कारण शिक्षक बालकरुपी  विद्यार्थ्याला योग्य शिक्षण ,संस्कार ,व मार्गदर्शन करून देशाचे सुजाण नागरिक बनवत असतात.

 शिक्षक विषयाच्या माहितीबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी , मूल्ये ,कौशल्य ,देशभक्ती , राष्ट्रप्रेम, समानता यांची रुजवणूक करत असतो . चांगला शिक्षक हा समाजाचा आदर्श असतो. कोणत्याही समाजाची उंची व विकास उत्तम शिक्षकावर अवलंबून असते . राष्ट्रासाठी भावी आदर्श नागरिक घडविण्याचे काम शिक्षकाचे आहे. शिक्षणप्रक्रियेत विद्यार्थी हा केंद्रस्थानी असतो त्या विद्यार्थ्याला समाजभिमुख करण्याचे , विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे महत्वाचे काम शिक्षक करत असतो.

शिक्षकाचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही कारण आज जर आपण जीवनात यशस्वी झालो आहोत तर ते फक्त आपल्या गुरुमुळेच. आपण आपल्या गुरूंचे ऋण जीवनात कधीच फेडू शकत नाही परंतु चांगले शिक्षण घेऊन यशस्वी झालो, देशाचे आदर्श नागरिक बनून देशाची सेवा केली तर हीच आपल्या गुरूंना आदरांजली ठरेल.

आजच्या ह्या प्रसंगी सर्व शिक्षकांना , गुरूंना वंदन.

मिलिंद पाडेवार, भोसला मिलिटरी महाविद्यालय नाशिक

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!