डॉ. संदीप कळमकर यांना साक्षीसाठी अजामीनपात्र वॉरंट

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – मोटर अपघात नुकसान भरपाीच्या प्रकरणात साक्ष समन्स काढून ती बजावूनही गैरहजर राहणार्‍या डॉ. संदीप कळमकर यांना जिल्हा न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
रासनेनगर येथील अरुणा शिंदे यांचा 30 जानेवारी 2011 रोजी अपघात झाला होता. त्यांनी ज्लिहा न्यायालयात नुकसानभरपाईचा दावा अ‍ॅड. सुरेश लगड यांच्यामार्फत दाखल केला. दाव्यात डॉ. कळमकर यांना साक्ष समन्स काढूनही ते अनुपस्थित राहिले.
त्यामुळे न्यायालयीन कामकाज प्रलंबित राहिले. न्यायालयाने त्यांना जामीनपात्र काढले. तरीही ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढून साक्षीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश केले आहे.
साक्षीसाठी डॉक्टरांविरुद्ध अजामीनापात्र वॉरंट जारी होण्याचा नगरमधील हा पहिलाच प्रसंग आहे. शिंदे यांच्या वतीने अ‍ॅड. सुरेश लगड, अ‍ॅड. शारदा लगड, अ‍ॅड. सुजाता बोडखे काम पाहत आहेत.

LEAVE A REPLY

*