Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

डॉ. पैठणकर यांना प्रशासनाची अंतिम नोटीस

Share
थकीत करधारकांची नावे झळकली फ्लेक्सवर, Latest News Taxpayer Name Flex Amc Action Ahmednagar

अनधिकृत कामकाज करीत असल्याचा मागितला खुलासा

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख आरोग्याधिकारी डॉ. एन. एस. पैठणकर यांना प्रशासनाने अंतिम नोटीस बजावली आहे. बदली आदेशानंतरही पदभार न सोडता अनधिकृतपणे कामकाज सुरू असल्याबाबत 24 तासांत खुलासा करण्याचे या नोटिशीमध्ये म्हटले आहे. यामुळे डॉ. पैठणकर आणि प्रशासन यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे.

विविध आक्षेपांच्या आधारावर चौकशी सुरू असलेल्या डॉ.पैठणकर यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना पुन्हा घनकचरा विभागात नियुक्त करण्यात आले होते. प्रशासनाच्या या निर्णयावर शिवसेनेने सर्वसाधारण सभेत आक्षेप घेतला होता. त्यानंतर शिवसेनेचे नेते व नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेत डॉ. पैठणकर यांची बदली न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तसेच डॉ. पैठणकर यांनीही प्रशासनास पत्र देऊन माझी बदली कोणत्या नियमाने केली, याची विचारणा केली होती.

तसेच त्यांनी घनकचरा विभागाचा पदभारही सोडला नव्हता. शिवसेनेच्या इशार्‍यानंतर आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी आरोग्य विभागात त्यांची बदली केलेली आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्या अधिपत्याखाली काम करण्याचे या बदली आदेशात म्हटले होते. मात्र कोणत्या पदावर बदली केली, याचा उल्लेख नव्हता. बदली आदेशानंतरही डॉ. पैठणकर घनकचरा विभागातच कार्यरत आहेत. कार्यभार सोडण्याबाबत त्यांना प्रशासनाने सूचना दिल्यानंतर त्यांनी उलट कोणत्या नियमाने बदली केली, याची विचारणा करत कामकाज सुरू ठेवले आहे. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशानुसार त्यांना पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. बदली आदेशानंतरही अनधिकृतपणे कामकाज करीत असल्याबद्दल त्यांना खुलासा मागविण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!