मिसेस इंडिया अर्थ स्पर्धा : डॉ. मीना पोटे मिसेस फेमस

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – मिसेस इंडिया अर्थच्या स्पर्धेत नगरच्या नेत्रतज्ज्ञ डॉ. मीना पोटे यांनी नगरला बहुमान मिळवून दिला आहे. संपूर्ण भारतातील महिलांचे लक्ष लागलेल्या या स्पर्धेत डॉ. पोटे यांना मिसेस फेमस हा किताब मिळाला. एका छोट्या शहरातील महिलेने ही कामगिरी केल्याने त्या सर्वांच्या अभिनंदनास पात्र ठरल्या. अशी कामगिरी करणार्‍या त्या पहिल्याच नगरकर ठरल्या.
दिल्ली येथे ही नुकतीच ही स्पर्धा झाली. त्यांच्या समवेत डॉ. बापूसाहेब पोटे, डॉ. उदय पोटे, प्राजक्ता पोटे, डॉ. उल्हास पोटे, डॉ. दीप्ती पोटे, जिल्हा मराठाचे मुकेशदादा मुळे, भागिरथी हॉस्पीटलचे संचालक डॉ. महेश मुळे ही आप्तेष्ट मंडळी होती.
या स्पर्धेत तब्बल साडेचार हजार महिला सहभागी झाल्या होत्या. त्यातून आता अंतिम फेरीत अवघ्या 48 उरल्या होत्या. त्यांच्यात मिसेस अर्थच्या किताबासाठी लढत झाली. त्यात डॉ. पोटे यांनी हे यश मिळवले.
गेल्या सहा महिन्यांपासून ही स्पर्धा सुरू होती. प्रत्येक टप्प्यावर ही स्पर्धा कठीण बनली होती. ती काठिण्यापातळी ओलांडून डॉ. पोटे यांनी मिसेस फेमस बनल्या. विवाहित महिलांसाठी ही स्पर्धा घेतली जाते. डॉ. पोटे या नेत्रतज्ज्ञ आहेत. मार्केट यार्डात त्यांचे हॉस्पिटल आहे.
जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माधवआबा मुळे यांच्या त्या कन्या आहेत. अंबिका महिला बँकेच्या माध्यमातून त्या सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. एचसीडब्ल्यूए ही सामाजिक संस्था ही स्पर्धा घेते.
स्पर्धेत फिटनेस, सौंदर्य, समाजसेवा, आत्मविश्‍वास, कौटुंबिक पार्श्‍वभूमी अशा बाबी तपासल्या जातात. ही संस्था रोल मॉडेल बनविण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे डॉ. पोटे यांनी नगर टाइम्सशी बोलताना सांगितले.

हा किताब नगरकरांचा –
स्पर्धेत मी सर्वाधिक वयाची स्पर्धक होते. या किताबाने मी भारावून गेले आहे. माझ्यासाठी रॅम्प वॉक, फोटोसेशन वगैरे गोष्टी नव्या होत्या. पती डॉ. बापूसाहेब पोटे, मुले उल्हास, उदय, सुना, नातवंडे, वडील आबा तसेच भावांनी प्रोत्साहन दिल्याने मी या किताबापर्यंत पोहचू शकले. या स्पर्धेमुळे मला सेलिब्रेटी केले. स्पर्धेत मोठ्या मोठ्या शहरातील महिला स्पर्धक होत्या. कुटुंबासोबतच नगरकरांनी साथ दिली. हा माझा नव्हे नगरचा किताब आहे.
-डॉ. मीना पोटे, मिसेस फेमस.

LEAVE A REPLY

*