Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर: डॉ. अनिल बोरगेच आरोग्य अधिकारी; आयुक्त भालसिंग यांची माहिती

Share
कर्मचार्‍याला मारहाण झाल्याने अत्यावश्यक सेवा धोक्यात, Latest News Amc Worker Kill Urgent Service Stop Ahmednagar

औषध फवारणीचा वेग वाढविणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कामकाज डॉ. अनिल बोरगेच पाहत असल्याची माहिती आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी दिली. दरम्यान साथीच्या आजाराने डोेके वर काढल्याची कबुली देत त्यावर फवारणी हाच पर्याय असून 50 फवारणी पंपाची तयारी झाल्याचेही ते म्हणाले.

शहरात मलेरिया, डेंग्यूसह साथीच्या आजारात वाढ झाल्याकडे आयुक्त भालसिंग यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, साथीचे आजार शहरात फैलावले आहेत, हे खरे आहे. महापालिकेकडे 14 फवारणी कर्मचारी आहेत. कंत्राटी फवारणी कर्मचार्‍यांची टेंडर प्रक्रिया आचारसंहितेत अडकली होती. ती आता पूर्ण होईल, त्यानंतर 50 कर्मचारी फवारणीसाठी शहरात फिरतील. फॉगिंगपेक्षा फवारणीला प्राधान्य देण्यात येणार आहे. डॉ. बोरगे आणि डॉ.सतीश राजूरकर यांच्यात आरोग्य अधिकारी पदावरून सुरू असलेल्या कलगीतुर्‍याकडे आयुक्तांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, मीच डॉ. बोरगे यांना आरोग्य अधिकारी पदाचे कामकाज पाहण्याचे सांगितले आहे. त्यामुळे तेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी आहेत. इतरांची हे काम करण्याची मानसिकता नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला.

नागरिकही जबाबदार, काळजी घ्या
डेंग्यूचे डास हा स्वच्छ पाण्यावर होतात. स्वच्छ पाणी हे सार्वजनिक ठिकाणी नसते. त्यामुळे नागरिकांचीही स्वच्छता ही जबाबदारी आहे. महापालिकेचे कर्मचारी नागरिकांच्या घरात जाऊन स्वच्छता करू शकत नाही. नागरिकांनीही काळजी घ्यावी असे आवाहन आयुक्त भालसिंग यांनी केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!