Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

दिंडोरी : डॉ. भारती पवार यांना सप्तशृंगी पावली; सकाळपासून सप्तशृंगीचरणी होत्या ध्यानस्थ

Share

नाशिक  | प्रतिनिधी

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार आणि दिवंगत माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या स्नुषा डॉ. भारती पवार आज सकाळपासून सप्तशृंगी गडावर ध्यानासाठी गेल्या असल्याची माहिती प्रतिनिधीकडून प्राप्त झाली आहे.

विशेष म्हणजे, डॉ पवार यांनी आपला भ्रमणध्वनी बंद करून ठेवला असून कल कुठल्या बाजूने आहे हे समजल्यानंतर त्यांनी सप्तशृंगीचे दर्शन घेतले. कार्यकर्त्यांनी सप्तशृंगी गडावर डॉ. पवार यांचे जोरदार स्वागत केले.

दरम्यान, डॉ. पवार नाशिककडे मार्गस्थ झाल्या असून भाजप आणि कार्यकर्त्यांकडून त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे.

साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धशक्तीपीठ म्हणून सप्तशृंगी देवीला महत्व आहे. सप्तशृंगी अनेकांची कुलदैवतदेखील आहे. डॉ. पवार मुळच्या कळवण तालूक्यातील असून सप्तशृंगीप्रती श्रद्धा असल्यामुळे आशीर्वाद घेण्यासाठी आपण याठिकाणी आल्याचे डॉ पवार म्हणाल्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!