Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष रेल्वे गाड्या

Share
रेल्वेचा प्रवास महागणार, Train Travel Expensive Train Board

नाशिकरोड । प्रतिनिधी

6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेला होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नागपूर-मुंबई दरम्यान विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाड्यांना नाशिकरोड, मनमाड, इगतपुरी बरोबरच अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामनगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावऴ, जळगाव, चाळीसगाव, कसारा, कल्याण, दादर येथे थांबा राहणार आहे.

नागपूरहून 4 डिसेंबरला 14.35 वाजता नागपूर-मुंबई गाडी प्रस्थान करेल. मुंबईला ती दुसर्‍या दिवशी 14.35 वाजता पोहोचेल. दुसरी गाडी नागपूरहून 5 डिसेंबर रोजी सकाळी 7.50 वाजता सुटेल. मुंबईल ती दुसर्‍या दिवशी 12.10 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01266 अप ही नागपूरहून 5 डिसेंबरला 15.55 वाजता सुटेल. मुंबईला ती दुसर्‍या दिवशी 11.35 वाजता पोहोचेल. मुंबईहून नागपूरला मुंबई-अजनी ही रेल्वे गाडी 6 डिसेंबरला 16.05 वाजता सुटेल.

मुंबई-सेवाग्राम 6 डिसेंबरला 18.40 वाजता मुंबईहून निघेल. दादर-अजनी ही रेल्वे गाड़ी 7 डिसेंबरला दादरहून 00.40 वाजता निघेल. मुंबई-नागपूर ही गाडी 7 डिसेंबरला मुंबईहून 12.35 वाजता निघेल. मुंबई-नागपूर ही गाडी 8 डिसेंबरला मुंबईहून 18.40 वाजता सुटेल. दादर-अजनी गाडी 8 डिसेंबरला दादरहून 00.40 वाजता निघेल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!