Type to search

maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमसैनिकांची चैत्यभूमीवर गर्दी

Share

मुंबई: महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी शिवाजी पार्कातील चैत्यभूमीवर येऊ लागले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाला चैत्यभूमीवर येऊन आंबेडकरांना अभिवादन करत असतात. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी विशेष सोय करण्यात आली आहे.

बेस्टतर्फे चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर चौपाटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘राजगृह’ हे निवासस्थान, आंबेडकर महाविद्यालय येथे 301 अतिरिक्त मार्गप्रकाश दिवे बसविण्यात आले आहेत. तसंच शिवाजी पार्क आणि मैदान परिसरात 18 फिरती शौचालयं, रांगेत उभे असणाऱ्यांसाठी चार फिरती शौचालयांची सुविधा देण्यात आली आहेत. तसंच पिण्याच्या पाण्याचे 16 टँकर्स उभे करण्यात आले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!