जिल्ह्यात ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

0

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त काँग्रेस पक्षाच्या च्यावतीने त्यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घालून त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दु:ख, दारिद्य्र आणि क्लेश दूर करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष सचिन गुजर, पक्षप्रतोद संजय फंड, ज्ञानेश्वर मुरकुटे, नगरसेवक दिलीप नागरे,मुक्तार शाह,भारतीताई परदेशी, आशाताई रासकर, चंद्रकला डोळस, संजय छल्लारे, मुन्ना पठाण, सुभाष तोरणे, भाऊसाहेब डोळस, किरण परदेशी, रियाज पठाण, सुनील क्षीरसागर, पुंडलिक खरे, रावसाहेब आल्हाट, युवराज फंड, अमोल शेटे, कृष्ण पुंड, गोपाल लिंगायत, सुरेश ठुबे, प्रतिक बोरावके, राजेश जोंधळे, नुरामामू, संजय गोसावी, निलेश करवाळ, सागर दुपटी, प्रताप गुजर जुबेर शेख आदी उपस्थित होते.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर अष्टपैलू व्यक्तीमत्त्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता व कायदे अशा विविध क्षेत्रांत आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने त्यांनी दीन, दलित, श्रमिकांच्या, विस्थापित, शोषित, अंध:कारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला, अशा थोर व्यक्तीमत्त्वास महापरिनिर्वाणदिनानिमित्त भावपूर्ण श्रध्दांजली असे प्रतिपादन नगराध्यक्षा आदिक यांनी केले.
नगरपरिषदेच्यावतीने लोकमान्य टिळक वाचनालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त नगराध्यक्षा आदिक बोलत होत्या. यावेळी सिध्दार्थ मुरकुटे, नगरसेवक ताराचंद रणदिवे, आप्पा गांगड, अ‍ॅड. सतोष कांबळे, प्रकाश ढोकणे, कलीम कुरेशी, केतन खोरे, विजय शिंदे, हंसराज आदिक, अण्णा पतंगे, जयंत चौधरी, पंडितराव बोंबले, राजेंद्र पानसरे, विजय शेलार, सुधाकर आंढगळे, बाबासाहेब मोरगे, डावखर, रमजान पटेल, सचिन बडदे, प्रदीप आहेर, साजिद मिर्झा, अ‍ॅड.तुषार आदिक, निरंजन भोसले, सैफ शेख, आदित्य आदिक आदी उपस्थित होते.

बेलपिंपळगाव (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तालुका रिपब्लिकन पार्टी तसेच गावातील रिपब्लिकन पार्टी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मित्रमंडळ यांच्यावतीने डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र साठे यांनी मानवंदना दिली यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सामजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गटकळ, माजी अध्यक्ष भीमजी साठे, पोलीस पाटील संजय साठे, अण्णासाहेब साठे, अरुण साठे, विष्णूपंत शिरसाठ, अशोक कांबळे, दिलीप दोंदे, संजय साठे, मधुकर साठे, योगेश शिंदे, योगेश जाधव आदींसह भीमसैनिक मोठ्या संख्येने हजर होते.

लोणी (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अष्टपैलू व्यक्तीमत्त्व होते. प्रत्येक क्षेत्राबद्दल परिपूर्ण माहिती व ज्ञान असलेल्या डॉ. बाबासाहेबांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रांत आपल्या वक्तृत्व आणि कुशल नेतृत्वाने दीन, दलित आणि श्रमिकांच्या अंध:कारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला, असे प्रतिपादन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक बन्सी तांबे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित अभिवादन कार्यक्रमात केले. यावेळी जेष्ठ पत्रकार गोपाळराव मिरीकर यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, मुख्य लेखाधिकारी बापूसाहेब अनाप, एच.आर. मॅनेजर भाऊसाहेब पानसरे, बोर्ड सेक्रेटरी एकनाथ सरोदे, खरेदी विभागाचे विलास वाणी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे शिवाजी निर्मळ, स्थापत्य अभियंता भाऊ भवर, सेक्रेटरी यांचे स्विय सहायक किसनराव सरोदे, इलेक्ट्रिक अभियंता शामराव गायकवाड, भांडार विभागाचे दीपक विखे, माध्यमिक विभागाचे नामदेव अनाप आदी उपस्थित होते.

अकोले (प्रतिनिधी) – अकोले तालुक्यातील आंबेडकरी जनतेच्यावतीने येथील महात्मा फुले चौक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने संयुक्त अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. अकोले येथेही संयुक्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.तहसीलदार मुकेश कांबळे व अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. अमहदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन सीताराम गायकर, प्रतिथयश व्यापारी किसन लहामगे, अमित रासने, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रम नवले, रोटरी क्लबचे अध्यक्ष व दैनिक सार्वमतचे उपसंपादक अमोल वैद्य, कामगार तलाठी बाबासाहेब दातखिळे, पत्रकार भाऊसाहेब साळवे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष शांताराम संगारे, माजी पं. स.सदस्य चंद्रकांत सरोदे, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गवांदे, कळस चे माजी सरपंच भाऊसाहेब वाकचौरे, आरपीआयचे नेते सुरेशराव देठे, राजेंद्र घायवट यांनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी प्रा.डी. एम.वाकळे, बाळासाहेब साळवे, बाळासाहेब नाईकवाडी, सुरेश अव्हाड, प्रवीण देठे, प्रशांत जगताप, संतोष देठे, मिलिंद रुपवते, निखिल जगताप, राहुल अव्हाड, राम मोहिते, संतोष संगारे, मारुती सोनवणे, सचिन जगताप आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*