Type to search

Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

डॉ. आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत चार कोटी 76 लाखांचा निधी

Share

नगर जिल्ह्यातील 106 कामांचा समावेश

अहमदनगर(प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत नगर जिल्ह्यासाठी चार कोटी 76 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यात नगर शहराला एक कोटी 20 लाख रुपयांचा निधी तर उर्वरीत निधी जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून रस्त्यांचे काँक्रिटीकरण, डॉ. आंबेडकर सभागृह उभारणी, पेव्हिंग ब्लॉक, दलित वस्ती विकास, स्माशन भूमी विकास, विद्युतीकरण आणि गटारी बांधण्याचे काम केले जाणार आहे.

2018 पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी यंदाच्या बजेटमध्ये 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून आमदारांनी सुचविलेल्या कामांसाठी 260 कोटी रुपयास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यातील यंदा 130 कोटी रुपयांची तरतूद खर्चास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे.

या निधीतून जिल्ह्यासाठी 4 कोटी 76 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.  यात मुठेवडगाव (श्रीरामपूर) दीड लाख, दत्तानगर चर्च परिसरात रस्ता कॉक्रिटीकरण दीड लाख, हरेगाव महाजनवाडी रस्ता खडीकरण दीड लाख, माळेवाडी मातंग वस्ती रस्ता दीड लाख, वडाळा महादेव राजवाडा रस्ता दीड लाख, घुमनदेव भैरवनाथ रस्ता दीड लाख, दिघी गावठाण रस्ता दीड लाख, बाम्हणगाव वेतळ रस्ता दीड लाख, भैरवनाथ नगर कदम वस्ती रस्ता दीड लाख, माळवाडगाव खडक वस्ती कॉक्रिटीकरण दीड लाख, भामठाण इंदीरा नगर रस्ता दीड लाख, बेलापूर अमोलिक वस्ती रस्ता दीड लाख, जाफराबाद हरीजन वस्ती दीड लाख, मातापूर गायकवाड वस्ती रस्ता दीड लाख, सरला आंबेडकर नगर रस्ता दीड लाख, निपाणी वडगाव अहिल्यानगर रस्ता दीड लाख, मुठेवडगाव गावठाण रस्ता दीड लाख, भवाभ वस्ती रस्ता दीड लाख, मुठेवडगाव-वडाळा रस्ता दीड लाख, दत्तनरगर बेथील चर्च रस्ता दीड लाख, दत्तनगर-रेणुकानगर वस्ती रस्ता दीड लाख, दत्तनगर-साईनगर वस्ती रस्ता दीड लाख, दत्तनगर-राजश्री शाहू नगर रस्ता दीड लाख, हरेगाव महाजनवाडी रस्ता दीड लाख, हरेगाव-कृष्णवाडी रस्ता दीड लाख, हरेगाव-ए ब्लॉकवाडी रस्ता दीड लाख, हरेगाव-एकवाडी रस्ता दीड लाख, हरेगाव-सातवाडी रस्ता दीड लाख, माळेवाडी मांतगवस्ती रस्ता दीड लाख, माळेवाडी महारवाडा रस्ता दीड लाख, माळेवाडी शिवपुरी रस्ता दीड लाख, माळेवाडी-काळेश्वर लिफ्ट रस्ता दीड लाख, वडाळा महादेव राजवाडा रस्ता दीड लाख, वडळा महादेव इंदिरा नगर रस्ता दीड लाख, वडाळा महादेव ससे वस्ती रस्ता दीड लाख, घुमनदेव भैरवनाथ गावठाण रस्ता दीड लाख, रामपूर शिंदे वस्ती रस्ता दीड लाख.

अकोले तालुक्यातील सुगाव बु. दलित वस्ती सिध्दार्थ नगर अडीच लाख, सुगाव डॉ. आंबेडकर नगर अडीच लाख, सुगाव बु. कॉक्रिटीकरण 2 लाख, म्हाळुंगी डॉ. आंबेकडर सभागृह 7 लाख 50 हजार, पिंपळगाव खांड सभागृह 7 लाख 50 हजार, अंबड सभागृहा 7 लाख 50 हजार, सुगाव खु. दलित वस्ती रस्ता 10 लाख, सातेवाडी ते खवटीवाडी डांबरीकरण 10 लाख. संगमनेर तालुक्यातील आंबेदुमला दलित वस्ती विद्यूतीकरण 5 लाख.

नगर तालुक्यातील मांडवे दलित वस्ती पिण्याची व्यवस्था 15 लाख, पेव्हींग ब्लॉक 5 लाख, दलित वस्तीत कामे 7 लाख 50, दलित वस्तीत पथदिवे 2 लाख 50 हजार, सामाजिक सभागृह 5 लाख, दरेवाडी हरीमळा रस्ता 10 लाख, दरेवाडी मातंगवस्ती सभागृह 5 लाख, पाथर्डी नगर परिषद पगारे वस्ती रस्ता 15 लाख, पथदिवे 9 लाख 50 हजार, धामणगाव रोड पुल बांधणे 10 लाख 50 हजार, शंकरनरगर रस्ता 17 लाख 50 हजार, करंजी दलित वस्ती सभागृह 5 लाख, तिसगाव चर्च पेव्हींग ब्लॉक 3 लाख 50 हजार, मिरी दलित वस्ती सभागृह 3 लाख 50 हजार.
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव सभागृह 12 लाख 50 हजार, वारी सभागृह 12 लाख 50, कोकमठाण सभागृह 12 लाख 50 हजार, शिंगणापूर सभागृह 12 लाख 50 हजार, बुकपिंपळगाव समाज मंदीर 5 लाख, चिंचबंद स्मानभूमी रस्ता 10 लाख.

नेवासा तालुक्यातील अंतरवाली तिरमले वस्ती रस्ता 20 लाख, रस्तापूर मातंग समाज मंदीर अडीच लाख, म्हाळस पिंपळगाव समाज मंदीर अडीच लाख, कुकाणा दलित वस्ती समाज मंदीर अडीच लाख, देवगाव वाल्हेकर वस्ती समाज मंदीर व पेव्हींग ब्लॉक अडीच लाख, पानेगाव शेंडगे वस्ती मंदीर बांधणी अडीच लाख, चांदा शास्त्री नगर समाज मंदीर 7 लाख 50 हजार, जवळके बु. पंडित वस्ती रस्ता 10 लाख, राजेगाव दलित वस्ती पाणी पुरवठा 5 लाख, देवगाव- जेऊर हैबती गायकवाडी रस्ता 10 लाख, कुकाणा भोसले-लोंढे वस्ती रस्ता 10 लाख, शिंगवे तुकाई देवी दलित वस्ती रस्ता 5 लाख, वाकडी समाज मंदीर अडीच लाख.

राहुरी बाभुळगाव दलित वस्ती स्माशनभूमी अडीच लाख, केंंदळ खु. कांबळे-वाघमारे वस्ती रस्ता अडीच लाख, सडे महादेव वाडी दलित वस्ती रस्ता अडीच लाख, चिंचविहीरे बिलीर्व्ह चर्च पेव्हींग ब्लॉक अडीच लाख, केंंदळ बु. रावडे रस्ता अडीच लाख, कोळेगावडी दलित वस्ती रस्ता अडीच लाख, ताहाराबाद दलित वस्ती चर्च समोर सभामंडप अडीच लाख, राहुरी खु. मातंग वस्ती रस्ता 3 लाख 50 हजार. नगर जेऊर स्मानभूमी संरक्षक भिंत 4 लाख, वडारवाडी दलित वस्ती विकास 5 लाख, पोखर्डी दलित वस्ती विकास 5 लाख, खोसपुरी दलित वस्ती रस्ता 3 लाख.

नगर शहरातील 8 नंबर वार्डातील बालाजी सोसायटीमधील रस्ते कॉक्रिटीकरणासाठी 10 लाख, भावनाऋषी सोसायटीतील गटार बांधणीसाठी 7 लाख, विणकर सोसायटीतील गटार बांधण्यासाठी 10 लाख, बालाजी सोसायटीमधील रस्ते क्रॉकिटीकरणाला 10 लाख, वार्ड नंबर 9 मधील लोणार गल्ली, बागडपट्टी येथील मोकळ्या जागांसाठी संरक्षक भिंत आणि सुशोभिकरणाला 10 लाख, मोची गल्लीतील रस्ते कॉक्रिटीकरणालाल 10 लाख, 10 नंबर वार्डातील लालटाकी परिसरातील जलाल शहा रस्ता कॉक्रिटीकरणाला 10 लाख, कल्याण रस्त्यावरील गटार बांधणीला 10 लाख रुपये, केडगावच्या 17 नंबर वार्डातील मिसाळ गल्ली ते माळे गल्ली दरम्यान गटार बांधणीला 20 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!