डीपीडीसी निवडणूक, 50 हजार रुपये मिळणार ; केवळ चार अधिकारी नियुक्तीचे निर्देश

0
हमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा नियोजन समिती निवडणुकीसाठी राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडून जिल्हा निवडणूक शाखेला कर्मचारी भत्त्या व्यतिरिक्त 50 हजार रुपये मिळणार आहे. निवडणूकीसाठी केवळ चार अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्याचे निदेॅश राज्याकडून प्राप्त झाले आहे.
नियोजन समितीच्या 2014 सालच्या पोट निवडणुकीसाठी दोन लाख 88 हजार रुपये खर्च आला होता. 2017 सालच्या नियोजन समिती निवडणुकीसाठी चार लाख रुपये खर्च येण्याची अपेक्षा आहे. या संदर्भात जिल्हा निवडणुक शाखेने जिल्हा नियोजन समितीला कळविले होते. जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीचा खर्च पूर्वी जिल्हा निवडणूक शाखेला करावा लागत होता.
जिल्हा निवडणूक शाखेने अनेक वेळा हा खर्च मिळावा म्हणून पाठपुरावा केला. या निवडणुकीच्या खर्चा संदर्भात राज्याच्या नियोजन विभागाचे उप सचिवांनी 27 जुलैला शासन परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार या निवडणुकीतील निर्वाचन अधिकारी (अतिरिक्त जिल्हाधिकारी) यांना 12 हजार रुपये मानधन, सहाय्यक निर्वाचन अधिकारी (उप जिल्हाधिकारी) यांना 10 हजार रुपये मानधन, गट अ अथवा ब मधील अधिकार्‍याला 10 हजार रुपये,
क गट मधील कर्मचारीला साडेसात हजार रुपये, ड गट कर्मचार्‍याला पाच हजार रुपये, मतमोजणी पर्यवेक्षकाला 350 रुपये, मतमोजनी सहायकाला 250 रुपये, चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍याला 150 रुपये संपूर्ण निवडणुकीसाठी मानधन मिळणार आहे. या व्यतिरिक्त जाहिरातीचाही खर्च द्यावा लागेल. जिल्हा नियोजन समितीचे बळकटीकरण या योजनेसाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीतून हा खर्च जिल्हा नियोजन समितीकडे मागावा असे परिपत्रकात म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

*