Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याघाबरू नका! काळजी घ्या!

घाबरू नका! काळजी घ्या!

नाशिक | प्रतिनिधी Nashik

करोना Corona साथीने स्वत:ची काळजी कशी घ्यावी याची चांगलीच जाणीव करून दिली आहे. पहिली, दुसरी लाट येऊन गेल्यानंतर आता तिसर्‍या लाटेत दररोज हजारो रुग्ण बाधित आढळून येत आहेत.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर नाशिकचे नामवंत डॉ. महेंद्र महाजन Dr. Mahendra Mahajan यांच्याशी चर्चा करून हात कसे धुवावे, सॅनिटायझर वापरताना कशी काळजी घ्यावी, मास्क कसे घालावे व कोणते घालावे, सामाजिक अंतर कसे पाळावे याबाबत माहिती जाणून घेतली. यामध्ये ते काय म्हणतात जाणून घेऊया.

हात धुणे

1. हातावर पाणी घेऊन साबण किंवा हॅण्डवॉश टाका

2. तळहात ते तळहात

3. बोटांमधील बेचक्या

4. दोन्ही हातांच्या बाहेरील बाजू

5. अंगठ्यांच्या तळाची आतील-बाहेरील बाजू

6. बोटांची बाहेरील बाजू

7. नखे

8. मनगटे

9. शेवटी पुन्हा नळ सोडून, हाताला आलेला साबणाचा फेस आणि पूर्ण अंश पाण्याखाली निघून जाईपर्यंत धुवावे

10. नळ बंद करून स्वच्छ टॉवेल किंवा रुमालाने कोरडे करावेत

सॅनिटायझर कसे वापराल

1. दोन थेंब सॅनेटायझर हाताच्या तळव्यावर

टाकून ते दोन्ही हाताच्या तळव्यांवर चोळा

2. दोन बोटांच्या मधील भागावर सॅनेटायझर

लागेल याची काळजी घ्या

3. दोन्ही हातांच्या मागच्या बाजूवर चोळा

4. हँड सॅनिटायझरने धुतलेले हात त्वचेजवळ

नेऊ नये

5. चेहर्‍यावर हात लावू नका

मास्कबाबत अशी घ्या विशेष काळजी

1. एन 95 माक्स वापरावा

2. सर्जिकल मास्क वापरला तरी चालतो फक्त गर्दीत ते दोन मास्क असावेत

3. मास्क घालताना व्यवस्थित नाक व तोंड झाकले जाईल याची काळजी घ्यावी

4. कॉटनचा मास्क वापरणे शक्यतो टाळावे

5. कॉटनचा मास्क असेल तर रोज स्वच्छ धुवूनच घालावा

इतर महत्त्वाचे

1. गरोदर महिलांनी विशेष काळजी घ्यावी

2. एखाद्या रुग्णाला आयसोलेशन करण्याची गरज

भासली तर एका वेगळ्या खोलीत त्याची व्यवस्था करावी

4. या व्यक्तीने स्वतःची भांडी स्वत:च धुतली तर अतिउत्तम

5. खाताना हात स्वच्छ धुवावेत

6. प्रोटीन ज्याच्यातून मिळेल ते सर्व खावे

- Advertisment -

ताज्या बातम्या