दोंडाईचा पालिकेच्या प्रशासकीय इमारतीमुळे शहराच्या सौंदर्यात भर!

0
दोंडाईचा । माझे शहर स्वछ, सुंदर, मूलभूत सुविधांनी युक्त असावं, सामान्य नागरिकाच्या मूलभूत सुविधा पुरवणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची नगरपालिका इमारत सर्व सुवीधा युक्त, अद्यावत, सुंदर व भव्य असावी, असे प्रत्येक शहरवासीयांचे स्वप्न व अपेक्षा असते.परंतु हे स्वप्न व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, दूरदृष्टी असलेला व विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून जनतेसाठी काम करणार्‍या नेतृत्वाची गरज असते.

असेच नेतृत्व दोंडाईचा शहराला मंत्री ना.जयकुमार रावल यांच्या रूपाने लाभले आहेत. त्याची फलश्रुती म्हणजेच दोंडाईचा शहरात होत असलेल्या विविध विकासकामांबरोबर पर्यटन व रोहयो मंत्री ना.जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून साकारलेली राज्यातील सर्वोत्कृष्ट, भव्य, अत्याधुनिक सुविधा युक्त दोंडाईचा वरवाडे नूतन प्रशासकीय नगरपालिका इमारत म्हणावी लागेल.

जिल्यातील दोंडाईचा शहर तापी व सातपुडा पर्वत परिसरात वसलेले शहर आहे. गुजरात व मध्यप्रदेश राज्याला लागून तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी दोंडाईचा हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. अश्वासाठी प्रसिद्ध असलेले सारंगखेडा हे ठिकाण या शहरापासून 15 कि.मी अंतरावर आहे.म्हणून भौगोलिक, आर्थिक व राजकीय दृष्टीने दोंडाईचा शहराला विशेष महत्त्व आहे.

अशा या शहरात राज्याचे पर्यटन व रोहयो मंत्री ना.जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून साकार झालेली राज्यातील सर्वोत्तम आधुनिक सुविधा युक्त असलेल्या दोंडाईचा वरवाडे नगरपालिकेची नूतन प्रशासकीय नगरपालिका इमारतीचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज होत आहे. ही दोंडाईचा शहरवासीयांसाठी गौरवाची व अभिमानाची बाब आहे. आजपासून ही सर्व सुविधायुक्त नगरपालिका इमारत दोंडाईचा शहर वासीयांच्या सेवेत दाखल होणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून व पर्यटन, रोहयो मंत्री ना. जयकुमार रावल यांच्या प्रयत्न व संकल्पनेतून साकार झालेली दोंडाईचा वरवाडे नगरपालिकेची नूतन प्रशाशाकीय इमारत विविध वैशिष्ट्य असलेली इमारत आहे.2017 साली राज्याच्या नगरविकास विभागाकडून या इमारतीच्या बांधकामसाठी मंजुरी मिळाली व राज्याचे पर्यटन मंत्री ना. जयकुमार रावल यांनी शहरवासीयांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नाने 16 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. ना.रावल यांनी दोंडाईचा वासीयांना वेळोवेळी आश्वासीत करताना सांगितले होते की माझे स्वप्न आहे ते दोंडाईचा वरवाडे नूतन प्रशासकीय इमारत ही राज्यातील सर्वोत्कृष्ट अशी साकारण्याचे यानिमित्त ना.रावल यांनी दोंडाईचा वासीयांना दिलेला शब्द पूर्ण केला व दोंडाईचा वरवाडे नूतन प्रशासकीय इमारत राज्याच्या नजरेत भरेल अशी साकारून दाखवली.

जलशुद्धीकरण व जलशीतकरण यंत्रणा- पाणी व विजेची सुंदर अशी व्यवस्था आहे.पाण्याच्या बाबतीत जलशुद्धीकरण व जलशीतकरण आशा स्वतंत्र व आत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यामध्ये संरक्षण भिंत, सुरक्षा रक्षक कक्ष इमारत संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाची आहे.

भव्य प्रवेशव्दार- भव्य व देखणे प्रवेश द्वार, दर्शनी भागाची केली सजावट करण्यात आली आहे. त्यात लाल दगड बांधकाम व इमारतीच्या जवळच वाहत असलेली अमरावती नदी हे दृश्य दोंडाईचा शहराच्या सौंदर्यात भर घालणारे आहे व दोंडाईचा वासीयांसाठी मनमोहक आहे.

नगराध्यक्षांसह अधिकार्‍यांचे परिश्रम- दोंडाईचा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष नयनकुवरताई रावल यांचे मार्गदर्शन व उपनगराध्यक्ष रवी उपाध्याय, सभापती निखिल जाधव यांच्यासह सर्व सभापती, अभियंते व सर्व नगरसेवक यांची मेहनत व योगदान या इमारतीला मूर्त रूप देण्यासाठी महत्वाचे असल्याचे पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. ना. रावल यांना व्यवस्थापन शाखेची पदव्युत्तर पदवी प्राप्त असल्याने त्यांच्याकडे कामाचे नियोजन व व्यवस्थापन याबाबत हातखंडा आहे. म्हणूनच ना. रावल यांच्या स्वप्नातील व दोंडाईचा शहरवाशीयांचा राज्यात सन्मान वाढवणारी वास्तू दोंडाईचा नगरपालिका नूतन इमारतीच्या रुपाने अमरावती नदीच्या किनारी दिमाखात उभी आहे. यामुळे नेतृत्वाचा आत्मविश्वास दुणावेलच यात शंका नाही, परंतु त्याच बरोबर नेतृत्वाला बळ आणि साथ देणारे हात ही आत्मविश्वसाने म्हणतील दिलेले बळ, साथ आणि विश्वास सार्थकी लागला.

वैशिष्ट्य पूर्ण इमारत, स्वतंत्र नागरी सुविधा केंद्र
नगरपालिका इमारत राज्यात नगरपालिकेची सर्वोच्च, सर्वोत्तम, अशी ही इमारत आहे. या इमारतीचे एकूण चार प्रशस्त मजले असून 31632 चौ.फूट बांधकाम झाले आहे. या नूतन प्रशासकीय इमारतीचा वैशिष्ट्य म्हणजे अध्यक्षदालन, उपाध्यक्षदालन, भव्य सभागृह, समिती सभागृह, सभापती दालने हे वातानुकूलित व प्रशस्त स्वरूपाची आहेत. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र व प्रशस्त दालनाची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या इमारतीत असलेले नागरी सुविधा केंद्र! हे शहरातील नागरिकांच्या जन्म नोंद, विवाह नोंद, ना-हरकत दाखले असे विविध प्रशासकीय दाखले व सुविधांसाठी महत्वाचे केंद्र ठरेल.

इमारत चार मजल्याची असल्यामुळे जिन्या बरोबरच लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे. सभागृहामध्ये सभेच्या व्यवस्थेसाठी स्वतंत्र व आधुनिक माईकची व्यवस्था व संपुर्ण इमारतीत फर्निचर करण्यात आले आहे. स्वच्छता गृह, स्वयंचलित अग्नीशमन यंत्रणा व सुरक्षेसाठी सी.सी.टी.व्ही.कॅमेरा व सभागृहामध्ये पॉवर पॉइंट प्रस्तुतिकरणासाठी प्रोजेक्टर बसविण्यात आले आहेत. तसेच इपीबी एक्स यंत्रणा, युपीएस, इयर वॉश यंत्रणा अशा प्रकारच्या अत्याधुनिक यंत्रांनी युक्त ही इमारत आहे.

LEAVE A REPLY

*