हस्ती स्कूल येथे युवादिनी वाद-विवाद स्पर्धा

0
दोंडाईचा । वि.प्र.- हस्ती चँरिटेबल ट्रस्ट संचलित हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेज येथील लिओ क्लब दोंडाईचा हस्ती एंजल्स अँड जिनिअस तर्फे दि. 12 जानेवारी 2019 शनिवार रोजी स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून युवादिना निमित्त वाद विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी अतिथी म्हणून डॉ. श्रीराम महाजन- निवृत्त प्राचार्य दोंडाईचा तसेच हस्ती स्कूल शालेय समिती सदस्य डॉ. मंजिरीताई सोहनी, डॉ. विजय नामजोशी तसेच शिक्षक पालक संघाचे सदस्य डॉ.राजेंद्र पाटिल, संजय सोनार व प्राचार्य एस.एन.पाटिल, प्रशासकीय अधिकारी हरिकृष्ण निगम हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक इ.9वी ची विद्यार्थिनी दिशा जैन तर अतिथी परिचय साक्षी जैन हिने करून दिला. यानंतर शिक्षिका प्रतिष्ठा परमार, डिंपल ठाकर, शिक्षक अरूण पाटिल तसेच विद्यार्थी स्पंदन भामरे व भूमी माखीजा यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांसाठी मछात्रावस्था में मोबाईल का प्रयोग करना उचित है या नहीं? या विषयावर हिंदी वाद विवाद स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेत निर्झरा टाटिया इ. 8 वी.प्रथम क्रमांक, रितू सोनार इ.7 वी.द्वीतीय क्रमांक, नंदिनी मिहानी इ.9 वी.तृतीय क्रमांक प्राप्त केला. तर योगिराज चित्ते इ.8 वी. याने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.

वरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लिओ क्लब दोंडाईचा हस्ती एंजल्स अध्यक्षा लिओ आयुषी भावसार, सेक्रेटरी लिओ दिशा जैन, ट्रेजरर लिओ साक्षी जैन आणि जिनीअस अध्यक्ष लिओ रोहन बोरसे, सेक्रेटरी लिओ प्रणव देवरे, ट्रेजरर लिओ यश जैन तसेच लिओ सदस्य कार्तिकी ठाकरे, जान्हवी पवार, गौरव पाटिल, दुर्गेश पवार व मार्गदर्शक शिक्षक मनोज ठाकूर यांनी परिश्रम घेतले.

हस्ती स्कूल येथे दरवर्षी नियमितपणे दिन विशेषांतर्गत अशा स्वरूपाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याद्वारा विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावतात. सोबतच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकासाला चालना मिळते.

LEAVE A REPLY

*