ट्रम्प म्हणतात ‘व्हाईट हाऊस टाकाऊ जागा’

0

व्हाईट हाऊस ही खऱ्या अर्थाने एक टाकाऊ जागा आहे. रिअल डम्प आहे. …. हे वक्तव्य दुसरे तिसरे कुणी केले नसून दस्तूरखुद्द तिथे राहणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यू जर्सी गोल्फ क्लब येथील आपल्या मित्रांना याबाबत नुकतेच सांगितल्याचे प्रसिद्ध झाले आहे.

आपण जास्तीत जास्त वेळ वॉशिंग्टनच्या बाहेर घालवतो, कारण व्हाईट हाऊस हे खरेच ‘डम्प’ आहे. असे ट्रम्प यांचे वक्तव्य एका गोल्फ मॅगझिनच्या हवाल्याने डेली मेल  ने प्रसिद्ध केले आहे.

ट्रम्प यांनी हे वक्तव्य खरेच गांभिर्याने केले की चेष्टेत हे मात्र समजू शकले नाही. मात्र त्यांचे हे वक्तव्य बाहेर पसरल्यानंतर माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची मुलगी चेल्सा हिने व्हाईट हाऊसचा स्टाफ रोज किती मेहनत घेतो त्याबद्दल त्यांचे आभार असे ट्विट केले आहे.

LEAVE A REPLY

*