Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नागरीकांनो घराबाहेर पडू नका – माजी मंत्री कोल्हे

Share

माजी मंत्री कोल्हे यांचा 91 वा वाढदिवस साधेपणाने साजरा

कोपरगाव (प्रतिनिधी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचा 91 वा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोना आपत्तीत सत्काराला फाटा देऊन हार तूरे, शाली, फेटे यांचा स्वीकार न करता त्यांनी सर्वांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले.

त्यांना राज्यभरातून तसेच राष्ट्रीय सहकारी साखर संघ, नवीदिल्ली येथून अनेकांनी शुभेच्छा दिल्या. साईबाबा संस्थानचे विश्वस्त बिपिन कोल्हे यांनी शहर तसेच ग्रामीण भागात त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जंतुनाशक फवारणी उपक्रम हाती घेत 10 हजार सुरक्षा मास्कचे वाटप करण्यात आले.

यात माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, विश्वस्त अमित कोल्हे, कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, सहकार महर्षी कोल्हे कारखाना सर्व संचालक, भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोंम, संजीवनी उद्योग समुहा अंतर्गत सर्व संस्थांनी विशेष योगदान दिले. काही ठिकाणी वृक्षारोपण करून स्वच्छता अभियान घेण्यात आले. गरजू गरीब, दीन दलितांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. रुग्णांना फळे वाटण्यात आली.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!