Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर भोसला महाविद्यालयात उतरले

Share

नाशिक | प्रतिनिधी

ज्या हेलीकॉप्टरमधून मुख्यमंत्र्यांसह इतर दिग्गजांनी प्रवास केला ते हेलीकॉप्टर नाशिकच्या भोसला मिलिटरी या सैनिकी महाविद्यालयात दाखल झाले आहे. शाळेच्या मैदानावर ते कायमस्वरूपी ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सैनिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठी मदत होणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे.

राज्य शासनाने येतील सेन्ट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये रविवारी मोठ्या खस्ता खात दाखल झाले.

एका भल्या मोठ्या कन्टेनरवर हे हेलीकॉप्टर आणण्यात आले होते. नाशिकमधील समर्थ नगर या परिसरात मोठे झाड असल्यामुळे कंटेनर जायला अडचणी येत होत्या.

त्यानंतर शक्कल लढवत हे हेलीकॉप्टर रस्त्यावर ठेवण्यात आले. त्यानंतर मूळ जागा करून हे हेलीकॉप्टरपुढे शाळेच्या आवारात नेण्यात आले.

अनेकांनी फोटो काढून सोशल मीडियात पसरवले. काहींनी अचानक आलेल्या हेलीकॉप्टरबाबत कुतूहल व्यक्त करत कॉलेजरोडला कसे पोहोचले याबाबत तर्क वितर्क लढवले.

डॉल्फिन एएस ३६५ एन ३ व्हीटी एमजीके असे या हेलीकॉप्टरचे नाव आहे. हे हेलीकॉप्टर मिळविण्यासाठी संस्थेकडून गेल्या दोन वर्षांपासून अनेक दिवसांपासून प्रयत्न केले जात होते.

दरम्यान, याबाबत ७ सप्टेंबर २०१७  रोजी अधिकृत निर्णय आल्यानंतर  प्रस्ताव पाठवण्यात आले होते. त्यानुसार प्रत्यक्ष हेलीकॉप्टर संस्थेला मिळाले. यामुळे सैनिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी मदत होणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे.

या आहेत अटी

हेलीकॉप्टर दिल्यानंतर काही अटी आणि शर्ती घालून देण्यात आल्या आहेत. यामध्ये हेलीकॉप्टर उड्डाणासाठी वापरता येणार नाही. फ्लाईट नोंदणी विमान चलन संचालनालयाकडेच राहील. कुठलाही भाग विक्री करता येणार नाही.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!