Thursday, May 2, 2024
Homeनगरडोळासणे पुलाजवळ टेम्पो उलटला, दोघे जखमी

डोळासणे पुलाजवळ टेम्पो उलटला, दोघे जखमी

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कर्जुले पठार व डोळासणे पुलाजवळ मालवाहतूक करणारा टेम्पो पलटी झाल्याने दोघेजण किरकोळ जखमी झाले आहे. ही अपघाताची घटना काल दुपारी 2.30 वाजेच्या दरम्यान घडली.

- Advertisement -

याबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, टेम्पो क्रमांक एमएच. 04 एफ डी 7981 हीच्यावरील चालक गोरख भागुजी लांडगे (वय 50) व रविंद्र गोरख लांडगे (वय 25) दोघेही राहणार वडगाव लांडगा हे टेम्पोमधून मका घेऊन पुण्याकडे जात होते.

काल दुपारी कर्जुले पठार व डोळासणे पुलाजवळ आले असता त्याच दरम्यान चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने टेम्पो पलटी झाला. अपघात झाल्याची माहिती समजताच डोळासणे महामार्गाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, अरविंद गिरी, नंदकुमार बर्डे, योगीराज सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

- Advertisment -

ताज्या बातम्या