पिसाळलेल्या श्‍वानाचा दोघांना चावा

0

पाईपलाईन परिसरातील घटना, रुग्णालयात उपचार सुरू

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात महापालिका हद्दीत श्‍वान निर्बीजीकरणाचा प्रश्‍न, मोकाट श्‍वान पकडण्याचा प्रश्‍न गाजत असताना पाईप लाईन परिसरातील नित्यसेवा भागात रविवारी मोकाट श्‍वानाच्या चाव्यात दोन मुले जखमी झाले आहेत. नगरसेवक निखील वारे, बाळासाहेब पवार यांनी तातडीने या दोघांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
पुर्वा व्यंकटेश क्यादर (वय. 14), क्षितीज बाळासाहेब गिरी (वय. 9) रा. नित्यसेवा हे घराच्या परिसरात खेळत असताना त्यांच्यावर तीन चार पिसाळलेल्या श्‍वानांनी हल्ला केला. यात हे दोघे मुले जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच वारे, पवार, सागर आर्कल, रवी बुडा यांनी नित्यसेवा येथे जाऊन जखमी पुर्वा आणि क्षितिज यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असून आ. संग्राम जगताप यांनी याठिकाणी भेट दिली आहे.
दरम्यान, सोमवारी (आज) शहरातील लहान मुलांचा महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी ही मुले पालिका आयुक्तांना जाब विचारत लहानमुलांनी घराच्या बाहेर पडायचे की नाही याची विचारणा करणार आहेत.

LEAVE A REPLY

*