Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

युवतीला श्‍वानदंश, पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहर व उपनगरांत मोकाट कुत्र्यांनी पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. काल सकाळी एका पिसाळलेल्या कुत्र्याने महाविद्यालयीन तरुणीस चावा घेतला. त्यानंतर या कुत्र्याने परिसरातून जाणार्‍या नागरिकांनाही चावा घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुलमोहोर रस्त्यावरील पोलिस चौकीजवळ घडली. या घटनेने खळबळ उडाली असून, नागरिकांनी मनपा कारभाराबाबत संताप व्यक्त केला.

काही दिवसांपूर्वी सर्जेपुरा येथील एका बालकाचा कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर सावेडी उपनगरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात शाळकरी मुले जखमी झाली होती. यानंतर महापालिकेने मोकाट कुत्री पकडण्याचे काम सुरू केले होते. मात्र सध्या महापालिकेकडून मोकाट कुत्री पकडण्याचे काम बंद करण्यात आले आहे. शहर व उपनगरांत ठिकठिकाणी मोकाट कुत्र्यांचे टोळके दिसत आहेत. दरम्यान, काल सकाळी गुलमोहोर रस्त्यावर एका पिसाळलेल्या कुत्र्याने महाविद्यालयीन तरुणीस चावा घेतला. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीस जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!