नांदगावात पिसाळलेल्या कुत्र्याचा ९ जणांना चावा; कुत्र्यापासून सावध राहण्याचे आवाहन

0
नांदगाव (विशेष प्रतिनिधी) | सध्या सर्वत्र बिबट्याचा धुमाकूळ सुरू असतानाच नांदगाव नांदगाव शहरात कुत्र्याने धुमाकूळ घालत आज पहाटे ५ वाजेपासून ९ जणांना चावा घेतला.

राहुल पवार, आनंदा दाभाडे, केवलबाई पाटील यांना गंभीर दुखापत होऊन सुमारे १२ टाके टाकण्यात आले. अनेकांच्या गाडीवर कुत्र्याने हल्ला करून चावा घेतला तर पाणी भरतांनाही काहींना चावा घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कुत्र्याच्या दहशतीखाली हा परिसर आला आहे.

चावा घेतलेले रुग्ण मल्हारवाडी, गांधीनगर, आनंद नगर, आंबेडकर नगर, रेल्वे गेट परिसरातील असल्याने ह्या भागात जास्त भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यातील १ तरुण ग्रामीण भागातून (पिंप्राळे) येथून काही कामानिमित्त नांदगावला आला असता त्यालाही ह्या कुत्र्याने चावा घेतला. माणसांबरोबर ईतर कुत्र्यांनाही चावा घेत असल्याने ईतर कुत्र्यांनाही लागण होत आहे. या कुत्र्याला लवकरात-लवकर पकडून बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहे.

ह्या जखमी रुग्णांवर वैद्यकीय अधिकारी रोहन बोरसे यांनी त्वरित उपचार सुरू केले असून नागरिकांना कुत्र्यापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

*