डॉक्टरच्या निष्काळजीमुळे कैद्याचा कारागृहात मृत्यू?

0
नाशिकरोड | दि. २७ प्रतिनिधी- येथील मध्यवर्ती कारागृहात पास्को कलम अंतर्गत शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याचा कारागृहातील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सदरचा मृत्यु तेथील डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याचे समजते. सदर कैद्याला अचानकपणे ह्रदयविकाराच्या झटका आल्याने त्याच्यावर योग्य वेळी उपचार न झाल्याने त्याचा मृत्यु झाल्याची चर्चा आहे.

या प्रकारामुळे कारागृहा प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. रमेश पांडुरंग बेंडकुळे (बी-४५५७२) हा कैदी गेल्या काही महिन्यांपासून शिक्षा भोगत होता. शुक्रवारी रात्री साडे अकरा ते बारा वाजेच्या सुमारास त्याच्या छातीमध्ये त्रास होवु लागल्याने इतर कैद्यांनी तातडीने संबंधित अधिकार्‍यांना सांगितले. त्यानंतर कारागृहातील वैद्यकीय वैद्यकिय कर्मचार्‍यांनी त्याची तपासणी केली.

त्यावेळी त्रास अधिकच असल्याने त्यांनी वरिष्ठ वैद्यकिय अधिकार्‍यांना याबाबत माहिती कळविली. त्यावेळी वरिष्ठ वैद्यकिय अधिकार्‍यांनी त्वरीत कारागृहातील रुग्णालयात येवुन उपचार देण्याची किंवा जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्याची आवश्यकता होती. मात्र वरीष्ठ वैद्यकिय अधिकारी हे सकाळपर्यंत कारागृहात आलेच नाही.

त्यामुळे रमेश बेंडकुळे या कैद्याचा शनिवारी सकाळी हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या प्रकारात वैद्यकिय अधिकारी आणि कारागृह प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बेंडकुळे याचा मृत्यु झाल्याची चर्चा कारागृहात असून सदर घटनेची काल दिवसभर कारागृहात चर्चा होती. संबधीत वैद्यकिय अधिकारी सकाळी रडत असल्याने या घटनेचे बिंग फुटल्याची एका विश्वसनीय सुत्राने माहिती दिली.

LEAVE A REPLY

*