Type to search

Featured सार्वमत

डॉक्टरांची ओपीडी बंद

Share

आयएमएचा संप । कलेक्टरांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोलकाता येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून आयएमएने आज पुकारलेल्या संपात नगरमधील डॉक्टर सहभागी झाले आहेत. डॉक्टर संपात सहभागी झाल्याने शहरातील खासगी दवाखान्यांतील ओपीडी बंद असल्याचे चित्र दिसून आले. ओपीडी बंद असल्याने अनेक रुग्ण आल्या पावली मागे गेली.

कोलकाता येथे ज्युनिअर डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवत आयएमएने आज संप करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदा करा, डॉक्टरांना सुरक्षा पुरवा अशा मागण्या प्रामुख्याने करत हा संप पुकारण्यात आला आहे. सोमवारी सकाळी सहा ते मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजेच 23 तासांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या दरम्यान ओपीडीसह वैद्यकीय सेवा बंद रहाणार आहेत. त्याचा फटका सामान्य रूग्णांना बसला. मार्ड, परिचारिका संघटना या सगळ्यांनी या संपाला पाठिंबा दिला आहे.

कोलकाता येथे डॉ डॉक्टरांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ नगरमधील सर्व डॉकटरानी अत्यावश्यक सेवा वगळून 24 तासाचा संप पुकारला आहे. त्यावर उपाय म्हणून केंद्रिय कायदा करावा अशी मागणी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना निवेदन देऊन करण्यात आली. या संपामुळे देशभरातील 3 लाख तर राज्यातील 40 हजारांपेक्षा जास्त खासगी डॉक्टर संपात सहभागी झाल्याने त्यांची ओपीडी बंद होती. आपत्कालीन आणि तातडीच्या सेवा मात्र सुरू असल्याचे सांगण्यात आले. या संपामुळे शासकीय रूग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये यामधील आरोग्य सेवेकडे रुग्णांनी धाव घेत तात्पुरता इलाज करून घेतला. कोलकाता येथे झालेल्या डॉक्टरच्या मारहाणीचा निषेध करत आयएमए अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशनने संपाची हाक दिली आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबलेले नाहीत. हल्लेखोरांवर कारवाई केली जावी अशीही मागणी केली जाते आहे तरीही अशा घटना थांबताना दिसत नाहीत त्याचमुळे संप पुकारण्यात आल्याचे आयएमएने स्पष्ट केले आहे. सर्वसामान्य रूग्णांना वैद्यकीय सेवा देणार्‍या डॉक्टरांना सुरक्षित वातावरण मिळालं पाहिजे अशीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान अनेक रूग्णांनीही डॉक्टरांवर होणार्‍या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. नगर अयएमएचे डॉ. शंकर शेळके, उपाध्यक्ष डॉ. सागर वाघ, डॉ. नरेंद्र बाकरवाडे, सीडब्लूसीचे केंद्राचे सदस्य डॉ. निसार शेख, सचिव अनिल सिंग, डॉ. विजय पाटील, डॉ. रझिया निसार, डॉ बापूसाहेब कांदेकर, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. सुधा कांकरिया, डॉ. कांचन रचा यांच्यासह अयएमएचे सदस्यांनी कलेक्टरांना निवेदन दिले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!