Type to search

Featured सार्वमत

पेशंटने डॉक्टरला चोपलं

Share

सिव्हीलमधील घटना, गुन्हा दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी) – रुग्णानेच डॉक्टरला मारहाण केल्याची घटना सिव्हील हॉस्पिटलमध्ये काल शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांत रुग्णाविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. अशोक रामचंद्र कटके असे मारहाण झालेल्या डॉक्टरांचे नाव असून त्यांनीच पोलिसांत फिर्याद दिली आहे. संदीप हरिभाऊ शेंडकर असे मारहाण करणार्‍या रुग्णांचे नाव आहे. डॉक्टर कटके यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सरकारी कामात अडथळा, मारहाण करून शिवीगाळ करणे आणि मेडिकेअर सर्व्हिस पर्सन्स आणि मेडिकेअर सर्व्हिस इन्स्टिट्यूशन हिंसा प्रतिबंध आणि नुकसान किंवा हानी कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.  डॉ. कटके हे शेंडकर यांच्यावर सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार करीत होते. उपचार करतेवेळी डॉ. कटके यांना अरेरावी करून शिवीगाळ केली. धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणल्याचे कटके यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोसई शिरसाट हे करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!