खळबळजनक : ऑपरेशन थिटरमध्ये डॉक्टरने केलं नर्सला किस

0

व्हिडीओ व्हायरल होताच डॉक्टरची हकालपट्टी

भोपाळ : मध्यप्रदेशच्या जिल्हा रुग्णालयातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका सहकारी महिलेला किस करतानाचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालयातील हा डॉक्टरचं निलंबन करण्यात आलं आहे. हे प्रकरणाकडे यासाठी गांभीर्याने पाहिलं जात आहे कारण जिल्हा सरकारी रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये हा प्रकार घडला आहे.

रुग्णालयातील एका शल्यविशारद असलेला डॉ. राजू निदारिया हा तिथल्याच एका नर्सला किस करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओतील दृश्य पाहून रुग्णालयात एकच गहजब उडाला. व्हिडीओतील ठिकाण हे रुग्णालयाचं ऑपरेशन थिएटर असल्याचं निदर्शनाला आलं आहे.

अशा प्रकारचं कृत्य व्यवसायासाठी अत्यंत निंदनीय असल्याचं सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी निदारिया याला तत्काळ निलंबित केलं आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी महिला नर्स आहे. हा व्हिडिओ ऑपरेशन थिएटरमध्ये बनवण्यात आल्याने तो अधिक चर्चेत आला आहे. मालवीय यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी निदारियाला नोटीस जारी करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

*