Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात करोनामुळे डॉक्टरचा मृत्यू

पुण्यात करोनामुळे डॉक्टरचा मृत्यू

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुण्यात खासगी प्रॅक्टिस करणार्‍या एका डॉक्टरचा करोनाने मृत्यू झाला आहे. करोनामुळे डॉक्टरने प्राण गमवल्याची ही पुणे शहरातील पहिलीच घटना आहे. 59 वर्षीय डॉक्टर गेल्या काही दिवसांपासून करोनाशी लढत होते. मात्र, अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या मृत्यूनंतर करोना योद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

- Advertisement -

पोलिसांपाठोपाठ आता डॉक्टरांनाही मोठ्या प्रमाणावर करोनाची बाधा होत असल्याचे समोर आले, त्यातच आता एका डॉक्टरांचा मृत्यू झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ आहे.
करोनाविरोधाच्या लढाईत डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी प्रचंड मेहनत घेत आहेत. डॉक्टर करोना रुग्णांवर उपचार करत आहेत. करोनाविरोधाच्या लढाईत त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे.

मात्र, आता डॉक्टर, नर्सेस यांनाच करोनाची लागण होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतही करोनामुळे एका नामांकित डॉक्टराचा मृत्यू झाला होता. मुंबईतील करोनाने डॉक्टरचा मृत्यूची ती पहिली घटना होती. त्यापाठोपाठ आता पुण्यातही एका खासगी प्रॅक्टिस करणार्‍या डॉक्टरचा करोनाने मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार करणारे डॉक्टरच आता करोनाचे बळी ठरल्यामुळे चिंता वाढली आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या