डॉक्टरांच्या बसला केडगावात अपघात

0

नगर टाइम्स,

एक ठार तिघांची प्रकृती चिंताजनक 37 जखमी

अहमदनगर (प्रतिनिधी) – मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटल व इतर रुग्णालयातील डॉक्टर पथकाच्या बसला भीषण अपघात झाला. त्यात बसचालक जागीच ठार झाला. तीन डॉक्टरांची प्रकृती चिंताजनक आहे. इतर 37 जण जखमी आहेत. आज (शनिवारी) पहाटेे 4 वाजण्याच्या सुमारास केडगाव बायपासजवळ हा अपघात झाला. पुढे चाललेल्या कन्टेनरला डॉक्टरांची बस (डीएलसीडी 0289) मागून धडकली. जखमींवर नगरमधील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

औरंगाबाद येथे आज कॅन्सरविषयी नामंकित डॉक्टरांचे सेमिनार आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी शुक्रवारी रात्री मुंबई येथील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील 40 डॉक्टरांची टिम खाजगी बसने औरंगाबादच्या दिशने निघाली होते. पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास केडगाव बायपासवरील नील हॉटेलसमोर डॉक्टरांची लक्झरी बस कंटेनरला(सीजी 04 जेए 2256) पाठीमागून धडकली. हा अपघात ऐवढा भीषण होता की त्यात बसचालक अल्ताफ अहमद (वय 37 रा.मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला. बसमधील डॉ. पुष्कर इंगळे, जानी कार्टन, अनिल टिबडेवाल हे तीन डॉक्टर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नगरमधील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर अन्य 37 डॉक्टर किरकोळ जखमी आहेत. दरम्यान या घटनेची माहिती समजताच अप्पर पोलिस अधीक्षक जयंत मीना, डीवायएसपी संदीप मिटके यांनी जखमींना रूग्णालयात हलविण्यास मदत केली.

टाटा कॅन्सर हॉस्पिटलची टीम
डॉ. पुष्कर इंगळे, डॉ.जॉनी कार्ल्टन, डॉ. अनिल टिबडेवाल, डॉ. आकांशा अनुप, डॉ.पल्लवी खुरुड, डॉ.स्वाती चूग, डॉ.निशिता सेहरा, डॉ. हर्षता के, डॉ. केतकी अडसूळ, डॉ. निखिल कल्याणी, डॉ. असफिया खान, डॉ. देबांजली दत्ता, डॉ. सचिता पाल, डॉ. मनीष बदाणे, डॉ. प्रशांत नायक, डॉ. उन्मेश मुखर्जी, डॉ. जाहिद मुलानी, डॉ. कस्तुरी बरवा, डॉ. सय्यदडे, डॉ. सचित आनंद, डॉ. गार्गी मुळे, डॉ. जिम्पी जोशी, डॉ.अनुज कुमार, डॉ.जिन्स मॅरी मॅथ्यू डॉ. प्राची सावंत, डॉ. समर्पिता मोहंती, डॉ. अजय शशीधर, डॉ. सुलगना मोहंती, डॉ. व्ही. मूर्ती, डॉ. ए. टेबीदेवाल, डॉ. दीपांजली अडळूकर, डॉ. सागर गायकवाड, डॉ. भाविन विषारिया, डॉ. दीपक देशमाने, डॉ. उपासना सक्सेना, डॉ. तिरंजल बसू, डॉ.आशिष, डॉ. अमेंद्र, डॉ. रवीशंकर दास, डॉ. प्रारंध सिंग, डॉ. प्रीती सुब्रह्मण्यम, नामदेव दगडू साळुंके (क्लिनर).

अनास्थेचा बळी
केडगाव बायपासच्या रस्त्यावर प्रशासनाने मोठे स्पीड ब्रेकर बनविले आहे. हा रस्ता शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा समजला जातो. पुणे-औरंगाबाद या दोन महानगरांना जोडणार्‍या या रस्त्यावर साधा सिग्नलही नाही. सिग्नलअभावी वाहनचालकांना जीव मुठीत धरून चौक ओलांडावा लागतो. काही महिन्यांपूर्वी मोटारसायकलवरून चाललेल्या तीन विद्यार्थ्यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला होता. चहूबाजूने वाहने भरधाव येतात. स्पीड ब्रेकरमुळे ती अचानक थांबतात. परिणामी पाठीमागील वाहनाची धडक बसते. या अपघातातही असेच झाले.

LEAVE A REPLY

*