हवे जबाबदाऱ्यांचे भान – डॉ. सतीश पवार

0
देश तसेच राज्यभरात होणार्‍या घडामोडींचे पडसाद आपल्या शहरातही पडतात. यापासून नाशिक शहर अलिप्त राहू शकत नाही. परंतु, तरीही सर्वांच्या सकारात्मक प्रयत्नांमधून अनेक निष्फळ वाद टाळून आपले शहर आपण शांत तसेच सुंदर म्हणून याची ओळख वाढवू शकते.

जिल्हा तसेच राज्याच्या विविध भागात डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. उपचारांमध्ये निष्काळजीपणा जाणवल्यास कायद्याद्वारे संबंधित यंत्रणेकडे दाद मागता येते. तरीदेखील कायदा हातात घेऊन डॉक्टर व हॉस्पिटल यांच्यावर हल्ले होताना दिसून येतात. वास्तविक रुग्णांचे काही हक्क तसेच त्यांच्या काही जबाबादार्‍यापण आहेत. यांचा योग्य समन्वय साधून आपण शहर तसेच जिल्ह्यातील आरोग्य विकास साधू शकतो.

नाशिक शहर, जिल्हा तसेच राज्याच्या विविध भागात डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. रुग्णांचे हक्क, रुग्णांच्या जबाबदार्‍या, वैद्यकीय निष्काळजीपणा व न्यायपद्धती भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) च्या N­BH च्या छइक प्रमाणनानुसार रुग्णहक्क नमूद करण्यात आले आहेत.

रुग्णास भेदभावरहित उपचार मिळणे, रुग्णांचे हित जोपासले जाणे, उपचारासंदर्भातील गोष्टींची समाधानकारक माहिती मिळणे, उपचाराची प्रक्रिया, त्याचे परिणाम, संभाव्य धोके व इतर पर्याय यांची विस्तृत माहिती मिळणे, उपचारासंदर्भातील संभाव्य खर्चाची माहिती मिळणे, उपचाराच्या सर्व नोंदी व कागदपत्रे आवश्यकता भासल्यास उपलब्ध होणे, वैद्यकीय निष्काळजीपणा वा रुग्ण हक्कांची पायमल्ली जाणवल्यास त्याविषयी संबंधीत यंत्रणेकडे तक्रार करणे. वैयक्तिक निष्काळजीपणा जाणवल्यास पुढील चार ठिकाणी रुग्ण किंवा अधिकृत व्यक्ती तक्रार नोंदवू शकतो.

फौजदारी स्वरुपाचा गुन्हा जाणवल्यास पोलिसांकडे तक्रार करावी लागते. पोलीस संबंधित तक्रारीची दखल घेतात व तपासाअंती अहवाल ‘मेडिकल निग्लिजन्स कमिटी’कडे अभिप्रायासाठी पाठवतात.

कमिटीने वैद्यकीय निष्काळजीपणा आढळून येत असल्याचा अभिप्राय दिल्यास पोलीस संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करतात. फौजदारी न्यायालयात गुन्हा सिध्द झाल्यास संबंधित डॉक्टरला गुन्हयाच्या स्वरूपानुसार शिक्षा ठोठावली जाते. यासह डॉक्टरांविरुद्ध शिस्तभंगाची तक्रार वैद्यकीय परिषदेकडे करता येऊ शकते. वैद्यकीय परिषद वैद्यकीय पेशाचे नियमन करते. डॉक्टरांसाठी तयार केल्या गेलेल्या नियमावलीनुसार त्यांचे वर्तन अपेक्षित असते.

त्यामुळे डॉक्टरांच्या नियमबाहय वर्तनासाठी संबंधित डॉक्टरांविरुद्ध वैद्यकीय परिषदेकडे तक्रार करता येते. सदर तक्रार सिद्ध झाल्यास वैद्यकीय परिषद संबंधित डॉक्टरांचा वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना विशिष्ट काळासाठी अथवा कायमस्वरूपी रद्द करू शकते.

डॉक्टरवरील हल्ल्यांसारख्या अशा बेकायदेशीर गोष्टी रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र वैद्यकीय सेवा – व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध)’ हा कायदा पारित केलेला असून यात दोषी आढळणार्‍या व्यक्तींना 3 वर्षांपर्यंत कैदेची शिक्षा व रुपये 50 हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. सदरील गुन्हा हा दखलपात्र व गैर जमानती असून नुकसान झालेल्या रकमेच्या दुप्पट नुकसान भरपाई दंडात्मक स्वरूपात वसूल करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

रुग्णहक्क तसेच रुग्णाचे कर्तव्य व्यवस्थित आखून दिलेले असून वैद्यकीय निष्काळजीपणा जाणवल्यास कुठल्याही स्वरूपाचे बेकायदेशीर कृत्य न करता त्याकरीता संबंधित यंत्रणेकडे कायद्याद्वारे दाद मागावी. अशा सर्व कायदेशीर बाबी रूग्ण तसेच डॉक्टरांसाठीही उपलब्ध आहेत. यामुळे थेट कोणत्या डॉक्टरला मारहाण करणे, कायदा हातात घेणे अथवा नुकसान करणे या गोष्टी टाळून कायदेशीर पद्धतीने गेल्यास सदर रूग्ण, नातेवाईकांना न्याय मिळू शकतो. व सांभाव्य घटना टाळून आपले शहर आपण शांत ठेवू शकतो.

LEAVE A REPLY

*