Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

विधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने

Share

नाशिक । प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगूल दोन महिन्यांनी वाजणार असून त्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी निवडणूक तयारीचा पूर्व आढावा घेतला. यावेळी महसूल विभागातील पाचही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवारी (दि.20) ही बैठक पार पडली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 मधील अनुभव,मतदार यादी शुद्धीकरण व नोंदणी,मतदान केंद्रे,मनुष्यबळ व्यवस्थापन, दिव्यांग मतदार कल्याण यासह मतदार जागृती आणि संपूर्ण विधानसभा सर्वत्रिक निवडणुकीच्या पूर्व तयारीबाबत विभागीय आयुक्त माने यांनी आढावा घेतला.

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 सुरळित व पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याच आदेश त्यांनी दिले.जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नूकत्याच पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या वॉर रूम सारख्या अनेक नवीन संकल्पनांची माहिती बैठकीत दिली.

यावेळी लोकसभा निवडणूक यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल माने यांनी जिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांचे अभिनंदन केले. नंदुरबारचे जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे,धुळ्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर,जळगांवचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी,नाशिकचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांसह अधिकारी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!