INSTA : फॉलोवर्ससाठी ‘काय’पण !

0

आपल्या आवडत्या कलाकारांसारखे दिसण्यासाठी चाहते कोणताही मार्ग निवडू शकतात.

अ‍ॅंन्जोलिना जोलीच्या चाहतीनेदेखील तिच्यासारखे दिसण्यासाठी 50 शस्त्रक्रिया केल्याची माहिती देत सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. अ‍ॅन्जोलिना जोलीप्रमाणे दिसण्यासाठी 50 हून अधिक शस्त्रक्रिया केल्याने चेहरा विद्रुप झाल्याचा एक फोटो सोशल मिडीयावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला.

मात्र आता त्याच सहार तबारने अजून एक धक्कादायक खुलासा केला आहे. 

सहार तबारचा एक फोटो शेअर करण्यात आला होता. ज्यामध्ये तिने अ‍ॅन्जोलिना जोलीप्रमाणे दिसण्यासाठी 50 शस्त्रक्रिया केल्याचा दावा केला आहे. मात्र आता फोटोत दिसणारा चेहरा शस्त्रक्रियेमुळे नव्हे तर केवळ मेकअप आणि फोटोशॉपची कमाल आहे. असे तिने म्हटले आहे. 

सहारने केलेला हा प्रकार केवळ पब्लिसिटी स्टंट होता. हा सगळा खटाटोप तिने इंस्टाग्रामवर फॉलोवर्स मिळवण्यासाठी केला होता.

اینجا چطورم؟

A post shared by sahartabar_page (@sahartabar_faan) on

LEAVE A REPLY

*