Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedउकडपेंडी

उकडपेंडी

ज्योत्स्ना पाटील

साहित्य : एक वाटी गव्हाचे पीठ, दोन टेबल स्पून तेल,एक टी स्पून मोहरी, एक टी स्पून जिरे, कढीपत्ता पाच- सहा पाने, एक बारीक चिरलेला कांदा, दोन-तीन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या, एक टोमॅटो बारीक कापलेला, मूठभर शेंगदाणे, चिमूटभर हळद, एक टी स्पून साखर, मीठ चवीपुरते, खोबर्‍याचा कीस व कोथिंबीर सजावटीसाठी.

- Advertisement -

कृती : गॅस पेटवून कढई गरम करून त्यात गव्हाचे पीठ टाकून मंद आचेवर खरपूस भाजून एका प्लेटमध्ये काढून ठेवणे. नंतर त्याच कढईत तेल टाकून शेंगदाणे थोडेसे तळून झाल्यावर मोहरी, जिरे,कढीपत्ता, हिरवी मिरची,कांदा, टोमॅटो असे सर्व साहित्य क्रमाक्रमाने टाकून कांदा लालसर होईपर्यंत परतणे, हळद टाकून नंतर त्यात गरम पाणी साधारणपणे दोन वाट्या टाकून उकळू द्यावे.

पाण्याला उकळी आल्यावर गॅस बंद करून कढईत हळूहळू भाजलेले गव्हाचे पीठ टाकता टाकताच चाळत राहणे. एकही गुठळी राहणार नाही याची काळजी घेऊन त्यात साखर व मीठ टाकून कढईवर झाकण झाकून पुन्हा गॅस पेटवून थोडीशी वाफ घ्यावी व गॅस बंद करावा.

प्लेटमध्ये उकडपेंडी सर्व्ह करताना त्यावरून खोबर्‍याचा किस व कोथिंबीर टाकून सर्व्ह करावी. सोबत शेव किंवा फरसाण असल्यास अजून उकडपेंडीची चव वाढते.

(टीप- या उकडपेंडीत बटाटा, मटरचे दाणे, तुरीचे ओले दाणे हेही आवडीनुसार टाकू शकतात.)

, गंगापूर रोड , नाशिक 13.भ्रमणध्वनी: 9325234118

- Advertisment -

ताज्या बातम्या