Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedपमकीन-जिंजर ब्रेड

पमकीन-जिंजर ब्रेड

साहित्य : 175 ग्रॅम बटर किंवा तूप , 140 ग्रॅम मध (अर्धा ते पाऊण वाटी), 1 फेटलेले अंडे,250 ग्रॅम पमकीन/कोहळा किसून (साल-बिया असतांना अर्धा किलो वजन भरायला हवे) ,100 ग्रॅम साखर, 350 ग्रॅम सेल्फ रायझिंग फ्लावर चाळून, 1 चहाचा चमचा आलेपूड किंवा सुंठ.

कृती : ओव्हन आधी 180 उ ला (साधारण 360ऋ) गरम करुन घ्या. फॅन ओव्हन असेल तर 160 उ ला गरम करुन घ्या. ब्रेड बनवण्यासाठी जे भांडे वापरणार असाल त्याला बटरचा हात लावून घ्या. यासाठी 1ज्ञस किंवा 2श्रल वाला ब्रेड टीन असेल तर उत्तम, नसेल तर नेहमीचे ओव्हन मध्ये चालणारे भांडे वापरावे.

- Advertisement -

एका भांड्यात पातळ केलेले बटर, मध आणि फेटलेले अंडे एकत्र कालवा. नंतर त्यात किसलेला कोहळा घाला. वरील मिश्रणात साखर, आलेपूड आणि पीठ घालून सगळे मिश्रण एकजीव करा. हे मिश्रण भांड्यात ओतून ओव्हनमध्ये 50-60 मिनिट बेक करा.

बेक केल्यावर सुईने किंवा टुथपिकने ब्रेडला टोचून बघावे, जर सुईला काहीही पीठ लागले नसेल तर तो तयार झाला असे समजावे. नसेल तर अजून 5-7 मिनिटे बेक करावा. बेक झालेला ब्रेड ओव्हन बाहेर काढून 10मिनिटे थंड होऊ द्यावा. नंतर भांड्याबाहेर काढावा.

- Advertisment -

ताज्या बातम्या