Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedरताळ्याच्या गोड पुर्‍या...

रताळ्याच्या गोड पुर्‍या…

स्वाती भाऊसाहेब पुरी

साहित्य – 4-5 मध्यम आकाराचे रताळे, अर्धा किलो गूळ, सुंठ वेलची पूड, बडीसोफ, गव्हाचे पीठ इ.

- Advertisement -

कृती – सर्वात प्रथम रताळे मऊ शिजवून घ्याव्येत. थंड झाल्यावर त्यांचे साल काढून किसून घ्याव्येत. त्यानंतर गूळ बारीक किसुन त्यात मिक्स करावा. दोन्हीचे मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात जितके गव्हाचे पीठ बसेल, तितके घालून घट्टसर कणिक मळून घ्यावी.

कणिक मळताना त्यात, सुंठ व वेलचीची पूड व कच्ची बडीसोफ घालावी. 10 मिनिटे पीठ भिजू द्यावे व लगेच पुर्‍या लाटून घ्याव्यात. तेलात तळून झाल्यावर थोडावेळ टिशू पेपरवर पसरून ठेवाव्यात व मग त्यांचा आस्वाद घ्यावा. ताज्या पुर्‍यांपेक्षा एक दिवसांनंतर जर त्या टेस्ट केल्या तर अतिशय अप्रतिम लागतात.

, मो. नं. -9421701087

- Advertisment -

ताज्या बातम्या