ओटमील थालीपीठ!

साहित्य : क्वेकर ओटमिल दीड वाटी, तांदळाचे पीठ पाऊण वाटी, थालीपीठ भाजणी 2-3 टेबलस्पून, किसलेली एक काकडी, चिरलेली कोथिंबीर , दही एक चमचा, हळद , तिखट, तीळ, मीठ ,धना-जिरा पावडर.

पाककृती : ओटमिलमध्ये तांदळाचे पीठ, दही, भाजणी, किसलेली काकडी कोथिंबीर आणि हळद, तिखट, तीळ, मीठ, धना-जिरा पावडर हे मिश्रण एकत्र करावे. 10 ते 15 मिनिट ते मळून बाजूला ठेवावे.

पीठ कोरडे वाटले तर काकडीचे किसून काढलेले पाणी घालावे. हात लावून सारखे करुन घ्यावे, नेहमीसारखी थालीपीठ थापावीत. असल्यास घरचे लोणी, नसेल तर दही,लोणच, चटणी आवडेल त्यासोबत खावे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *