हैद्राबादी व्हेज दम बिर्याणी

हैद्राबादी व्हेज दम बिर्याणी

हैदराबादी बिर्याणी जग प्रसिद्ध ,परंपरागत असून चविष्ट रुचकर लागते . इथे हॉटेलमध्ये बिर्याणी खूप छान मिळते .पण घरच्या बिर्याणीची लज्जत काही और असते.आम्हाला लंडनहून मुलाच्या मित्रांचे निरोप येतात "येतांना बिर्याणी घेऊन या....

रेसिपी ..

बासमती तांदूळ ..एक ग्लास .

खडा मसाला ..कलमी ,तेज पत्ता ,लवंग विलायची ,शहाजीरे

केसर, दूध, दही

फुलकोबी,गाजर,फरसबी ,बटाटे,

तिखट, मीठ, हळद ,तेल,मोहरी

तयारी...

बासमती तांदुळ स्वच्छ धुवून ठेवावे.

सगळ्या भाज्या व्यवस्थित चिरुन एका बाउल मध्ये दही घेऊन त्यात कालवून ठेवाव्या.त्यात हळद, थोड मीठ,थोड तिखट घालावे.

४-५ मोठे कांदे उभे चिरुन घ्यावे .

केसर दुधात टाकून ठेवावे.

पद्धत प्रक्रिया

एका पातेल्यात चार ग्लास पाणी घेऊन गॅसवर ठेवावे.त्यात लवंग,विलायची,तेजपत्ता,

कलमीचा छोटा तुकडा,शहाजीरे टाकावे. त्यातच तांदूळ शिजायला टाकून भात शिजू द्यावा.भात अर्धवट शिजवावा.अर्ध शिजलेला भात रोळीत काढून घ्यावा .जास्तीचे पाणी निथळून जाईल.

कढईत तेल घेऊन कांदा गुलाबीसर तळून घ्यावा.तो एका प्लेटमध्ये ठेवावा.त्याच कढईत

थोड तेल टाकून मोहरी टाकावी .मोहरी तडतडल्यावर दह्यात घातलेल्या भाज्या टाकाव्या . थोड पाणी टाकून भाज्या शिजू द्याव्या.

आता एका हंडीत भाताची एक लेयर टाकावी. त्यावर भाज्याची लेअर टाकावी. भाताची लेअर टाकायची.तळलेल्या कांद्याची लेअर टाकावी.

पुन्हा भाताची लेअर टाकावी.केसराची शिंपडावे.पुन्हा भाताची लेअर..

अशा लेअर टाकल्यावर हंडीवर झाकण ठेवावे.वाफ जाऊ नये म्हणून हंडीच्या काठाला घट्ट भिजवलेली कणिक लावावी.ही हंडी गॅसवर अगदी सीमवर ठेवून बिर्याणी शिजू द्यावी.

मीना खोंड, 7799564212

Related Stories

No stories found.