झिम्मड पाऊस

झिम्मड पाऊस
rain in maharashtra

अशा सांजवेळी

तुझा का दुरावा

चांदनी तू चंद्रमौळी

चांद मस्तकी धरावा ॥धृ॥

तुझ्या आठवांची

थेंब झिम्मड पडावी

मेघ दाटून यावे

नी भेट तुझी घडावी ॥1॥

तुला पाहिल्याने

तो पाऊस रुसावा

चिंब चिंब भिजण्याचा

एक बहाणा असावा ॥2॥

तुला भेटलेल्या

जाब फुलांनी पुसावा

रानभर तू भिजुनी

श्वास माझा फुलावा ॥3॥

- अ‍ॅड. सोमदत्त मुंजवाडकर,

कवी, गीतकार. मो. 8087735369

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com