समिधा

समिधा

जाणिवांना जाणणारी

समिधा यज्ञ व्हावी

अज्ञानांचा दुःखहर्ता

समाधी ज्ञान व्हावी

अर्पिलेल्या फुलांचाही

सुगंध दरवळावी

मृगातल्या पावसाची

मृदगंध धार व्हावी

भरतीच्या लाटेतही

सागर स्वार व्हावी

आटलेल्या सृजनांची

घागर क्षार व्हावी

गुंफलेल्या हातांची

किनार नार व्हावी

उत्तुंग भरारणारी

मिनार घार व्हावी

चुकलेल्या वासराची

गाय उद्धार व्हावी

अनाथांच्या नाथांचीही

माय आधार व्हावी

- अ‍ॅड. सोमदत्त मुंजवाडकर,

कवी, गीतकार. मो. 8087735369

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com