दुष्काळ

दुष्काळ

पडला कोरडा दुष्काळ, बीज जमिनीत आडलं

झाला डोंगर कर्जाचा, घोर जीवाला लागला|

मुलगी आली लगनाला, शिक्षण पोराचं थांबल

आजारानं केला रिकामा खिसा, जीव टांगणीला लागला|

पोरीच लगनं पोराचं शिक्षण, सापडेना वाट आलं एकाकीपण

काळ्या आईकडे पाही, विकायाचा विचार येई|

म्हणे धनीन नका करु घाई, धीर धरा आणखी काही

जातील हे दिन, सुख दारात येईन

जाई बायको झोपी, नवरा आढ्याला टांगला|

बापूसाहेब माधव अनाप (हनुमंतगाव ता. राहाता ७६२०६४०३३०)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com